चाहते पुन्हा पडणार गोविंदाच्या प्रेमात; 15 ते 16 गाणी स्वत:च लिहिली होती

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 मार्च 2021

गोविंदाचा डान्स बघून त्याचे चाहते वेडे होतात.आता त्याने आपल्या चाहत्यांना आणखी एका टॅलेंटची माहिती दिली आहे.

मुंबई: लोकं बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या अभिनयाचेच नाही तर त्याच्या डान्सचे पण दिवाणे आहेत. गोविंदाचा डान्स बघून त्याचे चाहते वेडे होतात.आता त्याने आपल्या चाहत्यांना आणखी एका टॅलेंटची माहिती दिली आहे. गोविंदा अलीकडेच इंडियन आयडल 12 चा रिअॅलिटी सिंगिंग शोमध्ये पोहोचला. यावेळी शक्ती कपूरसुद्धा त्याच्यासोबत उपस्थित होते. शोमध्ये गोविंदाने सांगितले की त्याने स्वत: आपल्या चित्रपटातील अनेक सुपरहिट गाण्यांसाठी गीत लिहिले आहे.  

शोमध्ये निहाल आणि सायली यांनी गोविंदाची लोकप्रिय असलेली 'आखियोस गोली मारे, व्हॉट्स योर मोबाईल नंबर' आणि 'तुझे मिरजी लागी' गाणी गायली. स्पर्धकांचा परफॉर्मेंस पाहून गोविंदाला त्याचे जुने दिवस आठवले.  "माझ्या पीक पीरियड वर 15 -16 गाण्यांचे चित्रिकरण झाले होते. ती सगळी गाणी मी लिहिली होती.  मी लेखकांना सांगायचो की मला वाईट वाटते पण कधी न कधी मी म्हणेन की ही गाणी माझ्याद्वारे लिहिली गेली आहेत, असे गोविंदा म्हणाला.

Friendship Teaser: क्रिकेटनंतर हरभजन लगावणार अभिनयात चौके छक्के 

गोविंदाचे हे टॅलेंट बघून या  शोची जज नेहा कक्कड़, विशाल दादलानी आणि हिमेश रेशमिया चकित झाले. 'हटा सावन की घटा, बत्ती बुझा' हा संवाद देखील मी लिहिला होता, असे शोमध्ये गोविंदा म्हणतो. यानंतर शक्ती कपूर यांनी आपल्या चित्रपटांबद्दल कथा सांगताना गोविंदाच्या प्रतिभेबद्दल कथा सांगितल्या. गोविंदाच्या राजा बाबू या चित्रपटासाठी नंदूची व्यक्तिरेखा त्यांना खुद्द गोविंदाने समजावून सांगितली होती.  नाकातून कसे बोलायचे आणि या पात्रासाठी कसे वागावे हे त्यांना गोविंदा समजावून सांगायचा, असे शक्ती कपूर म्हणाले.

संबंधित बातम्या