ओटीटी प्रेमींसाठी चालू आठवडा ठरणार पर्वणी; बिग बुलसह 'या' नव्या वेब्सिरीजची एंट्री

big bull.jpg
big bull.jpg

कोरोना पँडेमिक काळात ओटीटी प्लॅटफॉर्मची लोकप्रियता जोरदार वाढत गेल्याचे पाहायला मिळाले होते. आपल्या पसंतीच्या वेब सिरीज आणि चित्रपट  पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने या प्लॅटफॉर्मवर आकर्षित होताना दिसून आले. लॉकडाउन काळात प्रेक्षक सिनेमागृहापर्यंत जाऊ शकत नसल्याने अनेक मोठे चित्रपट याच ओटीटी प्लॅटफॉर्म वर रिलीज करण्यात आले होते. (New Web series and Movie Coming on OTT in this week) 

'मॅडम मास्क कुठे आहे?' विचारताच किश्वर मर्चंटवर भडकले कंगनाचे चाहते
कुकी गुलाटी दिग्दर्शित आणि अजय देवगन निर्मित द बिग बुल हा चित्रपट नव्वदच्या दशकात झालेल्या स्टॉक एक्सचेंज घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेलाअसून  8 एप्रिल रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. लॉकडाऊन काळात प्रचंड गाजलेली वेब सिरीज 'स्कॅम 1992' च्या  कथेप्रमाणेच  या चित्रपटाची कथा असल्याचा अंदाज वर्तवला जातो आहे. या चित्रपटात अभिषेक बच्चन हर्षद मेहताची भूमिका साकारणार असल्याचे समजते आहे. या चित्रपटात फिमेल लीड रोलमध्ये टीव्ही अभिनेत्री निकिता दिसणार आहे, तर सोहम शाह आणि सौरभ शुक्ला यांच्यासारखे कलाकार सहाय्यक कलाकाराच्या भूमिकेत दिसतील. 'द बिग बुल' सिनेमागृहात प्रदर्शित होणार होता, परंतु लॉकडाऊनच्या कारणामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मवर लाँच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

त्यानंतर 'हॅलो चार्ली' 9 एप्रिल रोजी ऍमेझॉन प्राइम व्हिडिओवर येणार प्रदर्शित करण्यात येणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूरचा चुलत भाऊ आदर जैन मुख्य भूमिकेत आहे. हे अभिनेता आदर जैनच सिनेसृष्टीतील हे  एक डिजिटल पदार्पण असणार आहे. हॅलो चार्ली हा एक विनोदी चित्रपट आहे ज्यामध्ये  गोरिल्ला टोटो मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात एलनाझ नौरोजी, जॅकी श्रॉफ आणि रघुबीर यादव देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत, तर अभिनेत्री श्लोका पंडित या चित्रपटाद्वारे पदार्पण करते आहे. हॅलो चार्ली फरहान अख्तर आणि रितेश सिधवानी यांची कंपनी एक्सेल एंटरटेनमेंट निर्मित आणि पंकज सारस्वत दिग्दर्शित चित्रपट आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com