गोव्याला हसवण्यासाठी नितीन मिरानी 'ऑल सेट'

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 7 नोव्हेंबर 2020

आता परत एकदा गोमंतकीयांना हसवण्यासाठी  नितीन सज्ज झाला आहे. शुक्रवारी पणजीमध्ये तो कोविडचे नवीन नियम पाळत तो कमी प्रेक्षक संख्येसमोर आपला परफॉरर्मंस करणार आहे.       

पणजी-  गोमंतकीयांना कायमच हसवणारा कॉमेडियन नितीन मिरानी लॉकडाऊनमुळे बरेच दिवस समोर आला नव्हता. या वर्षाच्या सुरूवातीला फेब्रुवारीमध्ये तो शेवटचा प्रेक्षकांसमोर आला होता. आता परत एकदा गोमंतकीयांना हसवण्यासाठी  नितीन सज्ज झाला आहे. पणजीमध्ये तो कोविडचे नवीन नियम पाळत तो कमी प्रेक्षक संख्येसमोर आपला परफॉरर्मंस करणार आहे.       

 याबाबत अधिक माहिती देताना तो म्हणाला की, ‘परफॉर्म करण्यासाठी गोवा हेच का मला प्रिय आहे याचं उत्तर आहे गोमंतकीयांचं प्रेम. कारण हा शो हाऊसफूल झाला असून गोव्यातील लोकांनी कलाकारांना दिलेला हा पाठिंबा बघून खूप छान वाटतं. आयोजकांनी शोच्या ठिकाणी प्रेक्षकांच्या दृष्टीने अधिक सोयीची व्यवस्था केली आहे. लोक टोळीने येऊन आपल्या मित्रमंडळींबरोबर या शो चा आनंद घेऊ शकतात. मला आता एवढ्या दिवसांनी परत एकदा परफॉर्म करायला आनंद होत आहे,’ 

हा शो बघायला उत्सुक असणाऱ्या काही चाहत्यांनी आपापली मतं व्यक्त केली आहेत. यात डीजे मॅकेन्झी परेरा यानेही आनंद व्यक्त करताना सांगितले की, मी पाहिलेल्या विनोदी माणसांमधील विनोद हा सर्वोत्तम विनोदी माणूस असून आम्ही शो बघायला जाणार असल्याने अतिशय आनंदित आहोत. आंत्रप्रिनर खुशी हिनेही असेच काही मत व्यक्त केले असून ही हास्य थेरपी आता अत्यंत गरजेची असल्याचे म्हटले आहे. 

संबंधित बातम्या