मनोरंजनाला नो ब्रेक; मराठी स्टार शूटींगसाठी गोव्यात दाखल

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 25 एप्रिल 2021

आता अनेक मालिकांनी महाराष्ट्राबाहेर चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दररोज नवीन कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. शिवाय कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठी भर पडत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारकडून(Maharashtra Government) कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असल्या तरी कोरोना रुग्णांचा आकडा कमी होताना दिसत नाही. (No break to entertainment Arrived in Goa for Marathi star shooting)

राज्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ठाकरे सरकारने नियमावली जाहीर केली असून यामध्ये 22 एप्रिल ते 1 मेपर्यंत कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात चित्रपट, मालिका आणि जहिरातींचे चित्रीकरण बंद करण्यात आलं आहे. त्यामुळे आता अनेक मालिकांनी महाराष्ट्राबाहेर(Maharashtra) चित्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ‘सुख म्हणजे काय असतं! ‘रंग माझा वेगळा’ मालिकांच्या पुढील भागाचं चित्रीकरण गोव्यात (Goa) होणार आहे. तर ‘आई कुठे काय करते’, ‘स्वाभिमान’, ‘सागं तू आहेस का’ ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतील कलाकार पुढील भागांचे चित्रीकरण करण्यासाठी सिल्वासामध्ये दाखल झाले आहेत.

राधे साठी 'नो किसिंग' नियम मोडल्याने भाईजान चर्चेत

तसेच मराठी मालिकांसोबतच हिंदी मालिंकाचंही पुढील भागांचे चित्रीकरण महाराष्ट्राबाहेर करण्यात येणार आहे. हिंदी मालिकांमधील 'कुंडली भाग्य' आणि 'कुमकुम भाग्य' या मालिकांचं चित्रीकरण गोव्यात होणार आहे. त्याचबरोबर इमली, अनुपमा, आणि मेहंदी है रचने वाली' या मालिकांचं चित्रीकरण हैदराबादमध्ये होत आहे.
 
 

संबंधित बातम्या