नोरा फतेहीला कॉपी करणाऱ्या 3 मुलींचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल

सत्यमेव जयते 2 मधील कुसु कुसू या नोरा फतेहीच्या गाण्याने सर्व चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे
नोरा फतेहीला कॉपी करणाऱ्या 3 मुलींचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल
Nora Fatehi shares video of three girls dancing to song Kusu Kusu from Satyameva Jayate 2 has gone viral

सत्यमेव जयते 2 मधील कुसु कुसू या गाण्यावर तीन मुली नाचतानाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. मुलींनी केलेल्या दमदार परफॉर्मन्सने मूळ गाण्यात परफॉर्म करणाऱ्या नोरा फतेहीचेही लक्ष वेधून घेतले. नोराने तिच्या इंस्टाग्राम प्रोफाइलवर त्यांच्या कामगिरीचा एक स्निपेट शेअर केला आणि तो नेटिझन्सने डोक्यावर घेतला.

Nora Fatehi shares video of three girls dancing to song Kusu Kusu from Satyameva Jayate 2 has gone viral
सैफ अली खानचा आणि अमृता सिंगचा 'या' कारणामुळे झाला होता घटस्फोट

मुळात डान्स दिवाने सीझन 3 चा स्पर्धक उदय सिंगने शेअर केलेली क्लिप नोराने पुन्हा पोस्ट केली होती. व्हिडिओमध्ये तीन मुली या गाण्यावर उत्तम प्रकारे नाचताना दिसत आहेत. "ओएमजी, हे खूप सुंदर आहे! तुम्ही लोक खूप अमेझिंग आहात!" असे कॅप्शन नोराने या व्हिडिओला कॅप्शन दिले आहे. या पोस्टला 665k पेक्षा जास्त लाईक्स आणि असंख्य कमेंट केल्या आहेत. या तिघांनी दाखवलेल्या अचूक डान्स स्टेप पाहून लोक थक्क झाले.

जॉन अब्राहम आणि दिव्या खोसला कुमार अभिनीत सत्यमेव जयते 2 येत्या 25 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. दरम्यान नोरा फतेही अभिनीत कुसु कुसू हे गाणे ऑनलाइन रिलीज करण्यात आले आहे आणि त्याला आतापर्यंत 26 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. गाण्याचे बोल आणि संगीत तनिष्क बागची यांचे आहे, तर जहरा एस खान आणि देव नेगी यांनी हे गाणं गायलं आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com