आता 'द फॅमिली मॅन 3'; श्रीकांत तिवारी चीनशी लढणार? 

गोमंन्तक वृत्तसेवा
रविवार, 6 जून 2021

दक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समांथा अक्किनेनीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.

बॉलिवूडमधील (Bollywood) प्रसिध्द अभिनेता मनोज वाजपेयी (Manoj Bajpayee) याची प्रमुख भूमिका असलेली बहुचर्चित 'द फॅमिली मॅन 2' (The Family Man 2)  ही वेबसिरीज नुकतीच प्रदर्शित झाली आहे. 4 जून रोजी ही वेबसिरीज प्रदर्शित झाली आहे. मात्र निर्मात्यांनी चाहत्यांची उत्सुकता पाहता चक्क दोन तास आधीच ही वेबसिरीज प्रदर्शित केली. सीरीज लवकर प्रदर्शित झाल्यामुळे चाहत्यांनी सोशल मिडियावरील ट्विटरवरुन(Twitter) आनंद व्यक्त केला आहे. या सीरीजच्या माध्यमातून दक्षिणात्य सुपरस्टार अभिनेत्री समांथा अक्किनेनीने (Samantha Akkineni) बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. 'द फॅमिली मॅन' च्या दुसऱ्या सिझनच्या भरघोस यशानंतर सिरीजचा पुढचा सिझन येणार असल्याचे म्हटले जात होते.(Now The Family Man 3 Will Srikanth Tiwari fight China)

The Family Man-2 Trailer : ब्यूटी गर्ल पहिल्यांदाच दिसणार विलनच्या भूमिकेत

'पिंकव्हिला' ने दिलेल्या बातमीनुसार, कोरोना काळात 'द फॅमिली 3' (The Family 3) दाखवण्यात येणार आहे. कोरोना महामारीशी केवळ श्रीकांत तिवारी लढत नाही तर तो चीनशी दोन हात करताना दिसणार आहे. 'राजकीय परिस्थितीवर ही वेबसिरीज अवलंबून असणार आहे. निर्माते राज (Raj) आणि डीके (DK) यांनी मागील वर्षी झालेल्या लॉकडाऊनमध्ये (Lockdown) सीरीजचा तिसरा सिझन प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला होता. या तिसऱ्या सिझनमध्ये जग कोरोना विषाणूच्या अदृश्य शत्रूविरुध्द लढत असताना टास्क फोर्स चीनमधील शत्रूंशी लढताना दिसणार आहे.'  अशी माहिती देण्यात आली आहे.

चीनचं 'गुआन यू' हे भारताच्या विरुध्द मिशन 'द फॅमिली मॅन 3' मध्ये दाखवण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, गुआन यू हे चीनच्या हान राजवंशात हे एक सैन्य अधिकारी होते. आणि त्यांना महान मानले जाते. 'द फॅमिली मॅन' च्या पहिल्या सिझनमध्ये दिल्ली, मुंबई आणि काश्मीर खोरं दाखवण्यात आले होते. तर दुसऱ्या सिझनमध्ये लंडन, चेन्नई, मुंबई आणि दिल्ली ही शहरे दाखवण्यात आली आहेत. आता तिसऱ्या सिझनमध्ये पूर्वेकडील राज्ये दाखवण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र 'द फॅमिली मॅन 3' या वेबसिरीजची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.  

 

संबंधित बातम्या