ओ लाल शर्ट वाले...म्हणत अर्जून कपूरने फोटोग्राफरला फटकारले

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 1 मार्च 2021

काल रविवारी रात्री अर्जुन कपूर आणि मलायका अरोरासोबतही असेच काहीसे घडले. करिनाच्या मुलाला दोघे भेटायला गेले. त्यानंतर एक अशी घटना घडली की अर्जुन कपूर चिडला.

मुंबई: बॉलिवूड सेलेब्स बर्‍याचदा मस्त कूल मूड मध्ये दिसतात. पण कधीकधी त्याच्या मस्त मूड एंग्री यंग मॅनमध्ये बदलते आणि तो चाहत्यांसमोर येतो. काल रविवारी रात्री अर्जुन कपूर आणि मलायका अरोरासोबतही असेच काहीसे घडले. करिनाच्या मुलाला दोघे भेटायला गेले. त्यानंतर एक अशी घटना घडली की अर्जुन कपूर चिडला.

करीना कपूरची डिलिव्हरी झाल्यापासून बरेच जवळचे नातेवाईक आणि मित्र तिच्या भेटीसाठी जात आहेत. दुसर्‍या मुलाच्या जन्मानंतर सैफ-करीना नवीन घरात शिफ्ट झाले आहेत. याच अनुषंगाने अर्जुन आणि मलायका करीना कपूर आणि सैफ अली खानला भेटण्यासाठी त्यांच्या नवीन घरी पोहोचले. घराबाहेर उभे असलेल्या छायाचित्रकाराचा अर्जुन कपूरला खूप राग आला. त्याचा आणि मलायकाचा फोटो काढण्यासाठी फोटोग्राफरने भिंतीवर चढण्याची जोखीम घेतली होती. वास्तविक, ती व्यक्ती भिंतीवर चढून त्या दोघांचे फोटो घेत होती. अर्जुनने त्याला खाली येण्यास सांगितले पण तो लगातार त्यांचे फोटो काढण्याचा प्रयत्न करत राहिला. या प्रसंगानंतर अभिनेता अर्जून कपूर लाल पिवळा झाला. तो त्या फोटोग्राफरच्या दिशेने जाताच फोटोग्राफर पळून गेला. अरे लाल शर्ट वाल्या आता का घाबरून पळत आहे?' अशी हाकही त्याने यावेळी मारली.

अर्जुन कपूरच्या रागाचा हा व्हिडिओ आणि फोटो सोशल मिडियावर खुप व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये मलायकादेखील दिसून येत आहे. भिंतीवर चढण्यास नकार देतांना दिसत आहे. 'इमारतीच्या आत असे चढू नकोस,  हे चुकीचे आहे, असे म्हणताना अर्जुन  दिसला.

करीना कपूर दुसऱ्यांदा आई झाली आहे. ती दवाखान्यातून घरी परत आली आहे आणि तेव्हापासून इंडस्ट्रीतील तिचे मित्र तिला पहायला दररोज तिच्या घरी पोहोचत असतात. रविवारी रात्री अर्जुन आणि मलायका देखील दाखल झाले होते. यावेळी अर्जुन कपूरने ब्लॅक जीन्स आणि टीशर्ट घातली होती. त्याच वेळी मलायका निळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या ड्रेस मध्ये दिसली. मलायका आणि अर्जुन कपूर बर्‍याच दिवसांपासून एकमेकांना डेट करतांना दिसत आहेत. दोघांचीही छायाचित्रे वेळोवेळी सोशल मीडियावर पाहायला मिळतात. मलायका सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे.

 

संबंधित बातम्या