Men’s Hockey World Cup: हॉकी वर्ल्डकपपूर्वी सिंबाने घेतली ओडीशाच्या मुख्यमंत्र्यांची भेट

केद्रीय मंत्र्यांसह अनेक नेते कटक येथे होणाऱ्या मेगा हॉकी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.
Odisha CM Patnaik meets actor Ranveer Singh
Odisha CM Patnaik meets actor Ranveer SinghDainik Gomantak

Men’s Hockey World : बॉलिवूडचा प्रसिध्द अभिनेता रणवीर सिंह सध्या ओडिसा दौऱ्यावर आहे. आज संध्याकाळी होणाऱ्या हॉकी विश्वचषकात उद्घाटन सोहळ्यात तो सहभागी होणार आहे. पण या सोहळ्यापुर्वी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची भेट घेतली आहे. कटक येथील स्टेडिअमवर उद्घाटन सोहळा पार पडणार आहे.

मुख्यमंत्री नवीन पटनायक (Naveen Patnaik) यांनी ट्विट करत लिहिले की, "कटकच्या बाराबती स्टेडियममध्ये #HockeyWorldCup2023 सोहळ्यापूर्वी लोकप्रिय अभिनेते @RanveerOfficial याला भेटून आनंद झाला. मला खात्री आहे की त्याची उपस्थिती उत्सवात अधिक आकर्षण निर्माण करेल. सर्वांनी हॉकीचा उत्साह वाढउया."

या भेटी दरम्यान मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी रणवीर सिंग यांच्या नावाची जर्सीही दिली. हॉकी विश्वचषक ओडिशा राज्याची राजधानी भुवनेश्वर आणि राउरकेला या दोन शहरांमध्ये होणार आहे. नवीन पटनायक यांनी आधीच जाहीर केले आहे की, भारताने विश्वचषक जिंकल्यास संघातील प्रत्येक खेळाडूला एक कोटी रुपये मिळतील.

दरम्यान, गेल्या आठवड्यात सीएम पटनायक यांनी राउरकेला येथील बिरसा मुंडा हॉकी स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये वर्ल्ड कप व्हिलेजचे औपचारिक उद्घाटन केले. विश्वचषक व्हिलेज हे विक्रमी नऊ महिन्यांत बांधले गेले आणि हॉकी विश्वचषकाच्या उंचीला साजेशा सर्व सुविधांसह 225 खोल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com