पुन्हा एकदा सोनू सूद आला मदतीला धावून!

दैनिक गोमंतक
रविवार, 25 एप्रिल 2021

बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) अनेकदा गरजू लोकांना मदत करण्यासाठी पुढे येत असतो.

नवी दिल्लीः बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) अनेकदा गरजू लोकांना मदत करण्यासाठी पुढे येत असतो. त्याचे ट्विट (Twit)  सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वाचले जातात. कोरोना विषाणूमुळे  पुन्हा एकदा (Corona Second Wave) देशात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णालयांमध्ये बेड, औषधे आणि ऑक्सिजनची कमतरता असल्याने सर्व लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आता सोनू सूदने हीच समस्या लक्षात घेऊन ठोस पाऊल उचलले आहे. सोनू सूदने  टेलिग्रामवरती एक चॅनेल लाँच केला आहे आणि ट्विटद्वारे त्याची माहिती दिली आहे. (Once again Sonu Sood came for help)

ओटीटीवर 'वाइल्ड डॉग' चा धमाका; फॅन्सकडून नागार्जुनवर कौतुकाचा वर्षाव

आता संपूर्ण देश एकत्र होईल.माझ्या सोबत टेलिग्राम चॅनेलवर जोडा कोरोनाच्या या महामारीत हातात हात मिळवून लढूया आणि देशाला वाचवूया. या चॅनेलद्वारे सोनू सूद गरजू लोकांना रुग्णालयात बेड, औषधे आणि ऑक्सिजन (O2 Beds) प्रदान करणार आहे. आपल्या ट्विटमध्ये  सोनू सूदने लोकांना  कोविड फोर्समध्ये सामील होण्याचे आवाहनही केले आहे. सोनूचा मोगा वरून येणाऱ्या विमानावरती फोटो देखील लावण्यात आला होता. 

सोनू सूद लोकांना त्यांचा शिक्षण, उपचार, काम, नोकरी अशा प्रत्येक गोष्टीत मदत करताना दिसतो. सोनू सूदच्या मदतीमुळे, तर काही गावात सोनूची मूर्ती देखील बनविली गेली आणि लोक त्याची पूजा देखील करतात. त्याने आपल्या कामाद्वारे बरीच मने जिंकली आहेत. लॉकडाऊन दरम्यानही सोनू सूदने लोकांना खूप मदत केली होती. त्याने परदेशात अडकलेल्या विद्यार्थ्यांना विमानामार्फत भारतात आण्यासाठी प्रयत्न केले. त्याच्या चित्रपटातील कामा बद्दल  बोलले तर त्याने नुकताच 'किसान'  चित्रपटात साइन केला आहे. याशिवाय लवकरच तो 'पृथ्वीराज'मध्येही दिसणार आहे.
 

संबंधित बातम्या