ऑस्कर विजेते अभिनेता ख्रिस्तोफर प्लमर यांचे निधन

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

 ऑस्कर विजेते अभिनेता ख्रिस्तोफर प्लमर यांचे शुक्रवारी निधन झाले. ख्रिस्तोफर प्लमर 91 वर्षाचे होते. ख्रिस्तोफर प्लमर यांचे मॅनेजर लू पिट यांनी त्यांच्या निधनाची माहीती माध्यमांना दिली.

नवी दिल्ली: ऑस्कर विजेते अभिनेता ख्रिस्तोफर प्लमर यांचे शुक्रवारी निधन झाले. ख्रिस्तोफर प्लमर 91 वर्षाचे होते. ख्रिस्तोफर प्लमर यांचे मॅनेजर लू पिट यांनी त्यांच्या निधनाची माहीती माध्यमांना दिली. जगातील सुप्रसिध्द अभिनेत्यांमध्ये  ख्रिस्तोफर प्लमर यांची ओळख आहे, त्यांनी जगाचा असा निरोप घेतल्याने संपूर्ण चित्रपट जगतात शोककळा पसरली आहे. त्यांचे चाहते सर्वोत्कृष्ट अभिनयाची आठवण काढून भावुक होताना दिसत आहेत. 50 वर्षांहून अधिक काळ त्यांनी चित्रपटांमध्ये काम केले आहे.

एक ऑस्कर पुरस्कार, दोन टोनी अवॉर्ड आणि दोन एम्मी अवॉर्ड्सने ख्रिस्तोफर प्लमर यांना सन्मानित करण्यात आले आहे.  ख्रिस्तोफर प्लमर यांच्या ‘द साउंड ऑफ म्युझिक’ या चित्रपटाचे जगभरातुन भरभरून कौतुक करण्यात आले होते. चित्रपट सृष्टीत ‘द साउंड ऑफ म्युझिक’ हा चित्रपट  सर्वोत्कृष्ट संगीत चित्रपट म्हणून ओळखला जातो. या सिनेमात ख्रिस्तोफर यांनी कॅप्टन वॉन ट्रॅपची भूमिका केली होती. 2012 मध्ये वयाच्या 82 व्या वर्षी त्यांना  ‘बिगिनर्स’ या चित्रपटासाठी सहायक अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटात ख्रिस्तोफरने एका समलिंगी व्यक्तीची भूमिका साकारली होती. हा पुरस्कार मिळविणारे  ख्रिस्तोफर प्लमर हे सर्वात ज्येष्ठ अभिनेते ठरले होते.

दरम्यान, ख्रिस्तोफर प्लमर यांनी ‘इनसाइडर’, ‘अ ब्युटीफुल माइंड’ आणि ‘द लास्ट स्टेशन’ या सिनेमांतूनही चांगली कामगिरी केली होती. ख्रिस्तोफर प्लमर यांनी अख्ख्या कारकीर्दीत नेहमी साइड रोल करायलाच प्राधान्य दिले. त्यांचे अनेक चित्रपट हीट झाले आहेत. त्यांबद्दल त्यांना पुरस्कारही मिळाले आहेत, मुख्य नायक म्हणून काम करण्याची ख्रिस्तोफर प्लमर यांची इच्छा यांची कधीच नव्हती.

गोव्याच्या बातम्या वाचण्यासाठी येते क्लिक करा

संबंधित बातम्या