लहानपणी सेक्शुअल सीन्स शूट केल्याचा परिणाम माझ्या जडणघडणीवर झाला : नताली पोर्टमन

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 11 डिसेंबर 2020

बाल कलाकार म्हणून काम करत असताना एका मध्यमवयीन पुरूषाबरोबर चित्रीत केलेल्या लैंगिक दृष्यांचा परिणाम माझ्या जडणघडणीवर झाला, असं प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री 'नताली पोर्टमन'ने सांगितलं.

वॉशिंग्टन : बाल कलाकार म्हणून काम करत असताना एका मध्यमवयीन पुरूषाबरोबर चित्रीत केलेल्या लैंगिक दृष्यांचा परिणाम माझ्या जडणघडणीवर झाला, असं प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री 'नताली पोर्टमन'ने सांगितलं. यामुळेे मी माझ्या लैंगिकतेपासून दूर जाऊ लागले, मी काहीशी घाबरले होते त्यामुळे सेक्शुअल सीन्स शूट करायला मला नको वाटायाचं. हे लहानपणीच घडलं असल्याने मी जेव्हा किशोरवयात आले तेव्हा मला कोणतेही मेक-आऊट सीन्स नको हाते, त्यामुळे मी मुख्यत: असे सिन्स नसलेले चित्रपट करायला सुरूवात केली, असंदेखील तिने नमूद केलं.

 

1996 साली आलेल्या 'ब्यूटिफुल गर्ल्स' या चित्रपटात तिने 13 वर्षांची असलेल्या 'लोलिता' या पात्राची भूमिका साकारली होती, या पात्राचे एका मध्यमवयीन पुरूषाबरोबर लैंगिक संबंध असल्याचे चित्रित करण्यात आले होते. याचा मोठा परिणाम माझ्या जडणघडणीवर झाल्याचे नतालीने सांगितले. 'थॉर' चित्रपटांमधील अभिनय तसेच 'ब्लॅक स्वान' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून ऑस्कर पुरस्कार पटकावलेल्या नताली पोर्टमॅनने स्वबळावर तिचं करिअर बनवलं आहे. पण हॉलीवूडमध्ये तरुण स्त्रियांना ज्या प्रकारे वागणूक मिळते त्याबद्दल सर्वच स्तरांमधून निराशा व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या