Oscars 2021 Actor Irrfan Khans memories light up
Oscars 2021 Actor Irrfan Khans memories light up

Oscars 2021: अभिनेते इरफान खान यांच्या 'आठवणींना' उजाळा

जगभरातील सर्व चित्रपट रसिकांसाठी ऑस्कर (Oscars) सोहळा हा पर्वणीच असतो. भारतीय वेळेनुसार सोमवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास ऑस्कर सोहळा पार पडला. नेहमीप्रमाणे चित्रपट रसिकांनी या सोहळ्याचा आनंद घेतला आहे. कोरोनाच्या (Corona Second Wave) पार्श्वभूमीवर ऑस्कर सोहळा कसा होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. मात्र यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे ऑस्कर सोहळ्यामध्ये अनेक बदल करण्यात आले. यावर्षीच्या ऑस्कर सोहळ्याचे खास वैशिष्ट म्हणजे गेल्या वर्षी निधन झालेल्या अनेक मान्यवरांना श्रध्दांजली देण्यात आली. त्यात बॉलिवूडचे प्रसिध्द अभिनेते इरफान खान (Irfan Khan) यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. (Oscars 2021 Actor Irrfan Khans memories light up)

93 वा अ‍ॅकॅडमिक अवॉर्ड हा भारतीय प्रेक्षकांसाठी विशेष अर्थपूर्ण होता. ऑस्कर सोहळ्यातील मेमोरियम सेग्मेंटमध्ये दिवंगत अभिनेते इरफान खान यांना श्रध्दांजली देण्यात आली. तसेच त्यांच्याशिवाय अनेक दिवंगत कलाकारांना श्रध्दांजली वाहण्यात आली. इरफान खान यांनी लाइफ ऑफ पाय, ज्युरासिक वर्ल्ड, इनफर्नो या सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं. यामुळे इरफान खान यांची लोकप्रियता कमालीची वाढली होती. इरफान खान यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. त्यांची ख्याती फक्त भारतातच नव्हती तर पार सातासमुद्रापलिकडे पसरली होती. मानवतेच्या अनेक मुल्यांना आपल्या दैनंदिन आयुष्यात स्थान देणाऱ्या अनेक अभिनेत्यापैकी इरफान खान एक होते.

2014 मध्ये पार पडलेल्या आयफा सोहळ्यात इरफान खान यांनी आपल्या सुंदर मनोगतातून सर्वांवर छाप पाडली होती. संवेदनशील अभिनेता म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं. आयफा सोहळ्यात भाषण करताना त्यांनी आपल्या परिवाराविषयी काही गोष्टी सांगितल्या होत्या. इराफान यांनी म्हटले होते की, ‘’माझ्यासाठी जोखीम घेणं म्हणजे काय, स्वप्न म्हणजे काय, यावर माझा पूर्ण असा विश्वास होता. मी अशा कुटुंबातून आलो होतो की, त्यात आमच्या अख्या परिवारातील कोणीही चित्रपट व्यवसायात काम केलं नव्हतं. मात्र काहीही झालं तरी आपल्याला एक चांगला अभिनेता व्हायचं आहे ते मनाशी ठरवलं होतं.’’

93 व्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) निराश झाली आहे. तिचा 'द व्हाइट टायगर' (The White Tigar) या  चित्रपटाला सर्वोत्कृष्ट दत्तक (Adopted)  स्क्रीनप्ले प्रकारात नामांकन देण्यात आले होते. पण या प्रकारात हा पुरस्कार 'द फादर' (The Father) या चित्रपटाला मिळाला आहे. हॉलिवूडच्या डॉल्बी थिएटरमध्ये पुरस्कार घोषित करण्यात आले.  ज्यामध्ये नोमडलँडचे वर्चस्व राहिले. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (फ्रान्सिस मॅकडॉर्मांड) आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन (क्लो झाओ) यासाठी तीन पुरस्कार जिंकले.

सर्वात जास्त वयाचे ऑस्कर मिळवणारे अभिनेते 
९३ व्या ऑस्कर सोहळ्यातील उत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ९३ वर्षीय अ‍ॅथोनी हॉपकिन्स यांना 'द फादर' चित्रपटासाठी देण्यात आला. या प्रकारात ऑस्कर जिंकणारे ते सर्वात वयस्कर अभिनेते ठरले आहेत. यापूर्वी 2011 मध्ये क्रिस्तोफर प्लम्मर यांना वयाच्या 82 व्या वर्षी बिगिनर्स चित्रपसाठी उत्कृस्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.

७३ वर्षीय अभिनेत्रीने रचला इतिहास
73 वर्षीय दक्षिण कोरियन अभिनेत्री युह-जंग उनने सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार जिंकून इतिहास रचला आहे. हा पुरस्कार जिंकणारी दक्षिण कोरियाची ती पहिलीचा अभिनेत्री आणि आशिया खंडातील दुसरी अभिनेत्री ठरली आहे. आशिया खंडात सर्वात पहिल्यांदा ऑस्कर पुरस्कार जपानी अभिनेत्री-गायक मियोशी उमेदी यांना १९५८ मध्ये मिळाला होता.  

भारतीय वंशाचे संगीत निर्माते 
मूळचे भारतीय असलेला अमेरिकन संगीत निर्माता सावन कोटेचा यांना 'यूरोविजन सॉंग कॉन्टेस्टः द स्टोरी ऑफ फायर सागा' चित्रपटासाठी मूळ गाण्याच्या श्रेणीतील 'हुसविक' या गाण्यासाठी नामांकन देण्यात आले होते. परंतु 'जुडास अँड द ब्लॅक क्राइस्ट' चित्रपटाचे 'फाइट फॉर यू' गाणे या प्रकारात जिंकले.

ऑस्करमधेही मास्क बंधनकारक 
यावेळी कोरोना साथीच्या आजारामुळे ऑस्कर सोहळा अगदी लहान प्रकारात ठेवण्यात आला होता. हा सोहळा 225 देशांमध्ये प्रसारित केला गेला. सोहळा नो मास्क धोरणाशी निगडित ठेवण्यात आला. तथापि, अभिनेते आणि इतर सेलिब्रिटींना केवळ जेव्हा ते कॅमेरासमोर होते आणि कॅमेरे चालू होते तेव्हाच मुखवटे काढण्याची परवानगी होती. यानंतर त्यांना फेस मास्क घालणे आवश्यक होते.

या पाच चित्रपटांतून नामांकन 
नामांकन समारंभात मांकला 10, द फादरला  6, जुडास आणि ब्लॅक क्राइस्ट 6, मिनारीला 6, नोमाडलँड 6,  साऊंड ऑफ साऊंड 6, द ट्रायल ऑफ द शिकागो 6, मा रॅनिस ब्लॅक बॉटम 5, होनहार तरुण महिलांना 5 नामांकने मिळाली आहेत. नामांकन समारंभाचे सूत्रसंचालन प्रियंका चोप्रा आणि निक जोनास यांनी केले.  मुख्य कार्यक्रमात यावेळी कोणताही होस्ट नव्हता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com