Searching For Sheela: ओशोंच्या वादग्रस्त पीएच्या जीवनावर डॉक्युमेंट्रीचा ट्रेलर रिलीज

गोमंन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 13 एप्रिल 2021

मां आनंद शीला यांच्या जीवनावर एक डॉक्युमेंटरी तयार करण्यात आला आहे, ज्याला सर्चिंग फॉर शीला (Searching For Sheela) असे नाव देण्यात आले. त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे.

"मां आनंद शीला", हे असे नाव आहे की कित्येक दशकांपासून चर्चेत राहिले आहे. आनंद शीला (Ma Ananda Sheela) यांना वादग्रस्त शीला म्हटले तर कदाचित यात काहीही चूक होणार नाही. ही तीच शीला आहे जी 80 च्या दशकातले सर्वात वादग्रस्त गुरु ओशो रजनीश(Osho Rajneesh) च्या अगदी जवळ होती. ओशोची एकेकाळी मदतनीस असणारी मां आनंद शीला यांच्या जीवनावर एक डॉक्युमेंट्री तयार करण्यात आला आहे, ज्याला सर्चिंग फॉर शीला (Searching For Sheela) असे नाव देण्यात आले. त्याचा ट्रेलर रिलीज झाला आहे. बॉलिवूडचे नामांकित चित्रपट निर्माता करण जोहरने (Karan Johar)  हे ट्रेलर रिलीज केले आहे.

धर्मा प्रोडक्शन्स निर्मित मां आनंद शीला यांच्या जीवनावर आधारित हा डॉक्युमेंट्री 22 एप्रिलला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. या डॉक्युमेंट्रीद्वारे ते रहस्य उघडकीस येणार आहेत, ज्यांना शीला देवता मानत होती, त्यांची जी रहस्य जगासमोर कधीच आली नव्हती ती रहस्य या डॉक्युमेंट्रीातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. तसेच या डॉक्युमेंट्रीतून ओशोच्या रहस्यमयी साम्राज्याच्या अनेक कथाही समोर येतील. प्रत्येकाने मां आनंद शीलाला ओशोची वादग्रस्त पीए म्हणून संबोधले आहे, परंतु आता या डॉक्युमेंट्रीच्या माध्यमातून ती जगाला सांगणार आहे की, शीला कोण आहे?

Birthday Special: अय्यो! मुत्तू स्वामींच्या पाच पात्रांनी जिंकली प्रेक्षकांची मने 

मां आनंद शीला सांगणार कथा

“तुम्ही त्याला पाहिले आहे, तुम्ही त्याला ऐकले आहे आणि तुम्ही त्याच्याविषयी नक्कीच ऐकले आहे. आता ती आपल्याला आपली कहाणी सांगण्यासाठी येथे येत आहे. 22 एप्रिलला सर्चिंग फॉर शीला नेटफ्लिक्सवर”, असे मां आनंद शीलाच्या डॉक्युमेंट्रीचा ट्रेलर रिलीज करताना करण जोहरने आपल्या इंस्टाग्रामवर लिहिले आहे.

मां आनंद शीला कोण आहे?

वडोदरा येथील एका साध्या पटेल कुटुंबात जन्मलेल्या शीला अंबालाल पटेल वयाच्या 18 व्या वर्षी अमेरिकेत शिकण्यासाठी गेल्या. शिक्षण संपल्यानंतर अमेरिकेतच त्यांचे लग्न झाले. यानंतर, दोघेही पती-पत्नी 1972 मध्ये प्रगत अभ्यासाच्या शोधात भारतात आले होते. येथे ते भारतीय धार्मिक गुरु ओशो रजनीश यांच्या आश्रमात पोहोचले. दोघांनी ओशोचे शिष्य बनून बरीच वर्षे आश्रमात वेळ घालवला.

काही काळानंतर शीलाच्या पतीचे निधन झाले. दरम्यान, ओशोने 1981 मध्ये शालीला त्यांची पीए बनवले. ओशोंचा आश्रम भारतात चांगला चालला होता, पण ओशोने त्यांचा आश्रम अमेरिकेत शिफ्ट करावा अशी शीलाची इच्छा होती. ओशोने शीलाचे म्हणणे एकले. आणि अमेरिकेत आपला नवीन आश्रम स्थापन केला. अमेरिकेच्या ओरेगॉन येथे रजनीशपुरम आश्रम उभारण्यात शीला यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. ओशोवर आधारित ‘वाइल्ड वाइल्ड कंट्री’ सीरीजमध्ये अमेरिकेत बांधलेल्या या आश्रमातील भव्य बांधकामाचा प्रवास दाखविला आहे.

सगळं काही व्यवस्थित सुरू असतांना 1984 मध्ये रजनीश बायो-टेरर अटॅकमध्ये मां आनंद शीला यांना हत्येच्या प्रयत्नात आणि छळ केल्याच्या आरोपाखाली दोषी ठरविल्या गेले. या प्रकरणात त्यांना 20 वर्षे तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती, परंतु त्यांनी केवळ 39 महिने तुरूंगात घालविला आणि त्या बाहेर आल्या. तुरुंगातून सुटल्यानंतर शीला स्वित्झर्लंडमध्ये गेल्या. दरम्यान, शीलावर अमेरिकेच्या फेडरल फिर्यादी चार्ल्स टर्नरच्या हत्येचा आरोप करण्यात आला होता. 1999  मध्ये शीलाला स्विस कोर्टाने या हत्येची दोषी ठरवले होते. त्यांनी स्वित्झर्लंडमध्ये दोन नर्सिंग होम विकत घेतले होते ज्यात त्या वृद्धांची सेवा करण्याचे काम करत होती.
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Karan Johar (@karanjohar)

संबंधित बातम्या