OTT Upcoming Series: 'दहाड', 'छत्रपती'सह ओटीटी शुक्रवारी देणार मनोरंजनाचा तडका...

नेटफ्लिक्स या शुक्रवारी सबस्क्राईबर्सना नवीन शो आणि वेबसिरीज पाहायला मिळणार आहेत.
OTT Upcoming Series
OTT Upcoming SeriesDainik Gomantak

OTT Upcoming Series: शाहिद कपूर आणि आदित्य रॉय कपूर नंतर , सोनाक्षी सिन्हा अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या आगामी एज-ऑफ-द-सीट क्राईम थ्रिलर - दहाड या चित्रपटाद्वारे डिजिटल पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.

 35 वर्षीय सोनाक्षी एका पोलिस अधिकाऱ्याची (अंजली भाटी) भूमिका साकारणार आहे ज्याला रहस्यमय आत्महत्येच्या मालिकेची केस सोपवली जाते.

जेव्हा तपास पुढे जातो तेव्हा कथेला एक मनोरंजक वळण मिळते, धक्कादायक गोष्टी उघड होतात ज्यामुळे प्रकरण अधिक गुंतागुंतीचे होते.

सोनाक्षीच्या दहाडसह इतरही चित्रपट ओटीटीवर मनोरंजनाचा तडका देण्यासाठी तयार आहे, चला पाहुया हे बाकीचे चित्रपट आणि सिरीज कोणत्या आहेत

1. 'द मदर' - नेटफ्लिक्स

चित्रपट निर्माते निकी कॅरोच्या आगामी अॅक्शन थ्रिलर – द मदरची चर्चा सध्या सुरूय. . या कथेत एका व्यावसायिक मारेकरीच्या जीवनाचा शोध घेतला जातो ज्याला तिने वर्षांपूर्वी सोडलेल्या आपल्या मुलाला वाचवण्यासाठी चर्चेत येण्यास भाग पाडले जाते.

अ‍ॅक्शन, ड्रामा, सस्पेन्स आणि थ्रिलचा उच्च दर्जाचा, नवीन नेटफ्लिक्सचा कंटेट चित्रपट देणार यात शंका नाही.

The Mother
The MotherDainik Gomantak

2.न्यूजसेन्स - अहा

न्यूजसेन्स ही एक नवीन सिरीज आहे जी या शुक्रवारी (12 मे 2023) अहा वर येणार आहे. आगामी मालिकेचे कथानक एका पत्रकाराच्या संघर्षाला ठळकपणे दाखवत असताना मीडियाची न पाहिलेली बाजू दाखवून देणारे आहे. बिंदू माधवी आणि नवदीप आगामी तेलुगू सिरीजमध्ये मुख्य भूमीका करणार आहेत.

Newsense
NewsenseDainik Gomantak

3.द ग्रेट सीझन 3 - हुलू

एमी अवॉर्ड-विजेत्या द ग्रेट या  सिरीजचे निर्माते पुन्हा एकदा पीरियड ड्रामाच्या आणखी एका आकर्षक सीझनसह परत आले आहेत जे कॅथरीनची कथा सांगते - द ग्रेटच्या आयुष्यात पीटर III सोबत लग्न झाल्यानंतर नाट्यमय वळण येते. तिला नव्या आणि मागासलेल्या संस्कृतीशी जुळवून घेता येईल का? जाणुन घेण्यासाठी ही सिरीज नक्की पाहा.

The Great 2
The Great 2Dainik Gomantak

4.जोगिरा सारा रा रा

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि नेहा शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेला , दिग्दर्शक कुशान नंदीचा आगामी रोमेडी एका मॅचमेकरभोवती फिरतो जो पूर्णपणे विरुद्ध व्यक्तिमत्त्व असलेल्या मुलीला मदत करण्याचा प्रयत्न करत असतो. पुढे काय होते याची उत्सुकता असेल तर हा चित्रपट जरुर पाहा.

Jogira Sara ra ra
Jogira Sara ra ra Dainik Gomantak

5. छत्रपती

छत्रपती हा निर्माता एसएस राजामौली यांच्या तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे ज्यात प्रभास मुख्य भूमिकेत होता. आगामी अॅक्शन थ्रिलर एका साध्या माणसाभोवती फिरतो जो पीडितांच्या समर्थनार्थसाठी संघर्ष करतो.

 जेव्हा त्याचा सावत्र भाऊ त्याच्यासाठी गोष्टी अधिक कठीण करण्याचा निर्णय घेतो तेव्हा कथानकाला नाट्यमय वळण मिळते. आगामी चित्रपटात नुश्रत भरुच्चा आणि बेल्लमकोंडा श्रीनिवास मुख्य भूमिकेत आहेत.

Chatrapathi
Chatrapathi Dainik Gomantak

6.दहाड

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा Amazon Prime Video ची नवीन मालिका - Dahaad मधून तिचे OTT पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे . राजस्थानमध्ये सेट केलेली, झोया अख्तर आणि रीमा कागती यांनी तयार केलेली आगामी मालिका ( दहाड ) एका पोलिस अधिकाऱ्याची गोष्ट सांगते जिला सार्वजनिक स्नानगृहात महिला आत्महत्या करण्याचे प्रकरण सोपवले जाते. 

धक्कादायक पुराव्यांची मालिका हे सिद्ध करते की हे अनपेक्षित मृत्यू खरे तर खून आहेत. ती गूढ कथा उकलण्यात आणि सीरियल किलरला पकडण्यात सोनाक्षी यशस्वी होईल का? सोनाक्षी सिन्हा व्यतिरिक्त, दहाडमध्ये गुलशन देवय्या, सोहम शाह आणि विजय वर्मा देखील प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.

Dahad
Dahad Dainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com