OTT: 'झुंड' सह 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज 'या' आठवड्यात होणार रिलीज

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अनेक चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत.
OTT: 'झुंड' सह 'हे' चित्रपट आणि वेब सीरिज 'या' आठवड्यात होणार रिलीज
Bollywood Movies Dainik Gomantak

जगात आलेल्या महामारीनंतर प्रेक्षक ओटीटी या ऑनलाइन प्लॅटफॉर्मकडे वळू लागले आहेत. ओटीटीवर प्रत्येक आठवड्यात अनेक सिनेमे आणि वेबसीरिज रिलीज होत असतात. या आठवड्यात देखील अनिल कपूरच्या 'थार' पासून बिग बींच्या 'झुंड'पर्यंत अनेक सिनेमे आणि वेब सीरिज परिलीज होणार आहेत. (Bollywood Movies news)

* झुंड (Jhund)

अमिताभ बच्चन यांचा 'झुंड' (Jhund) चित्रपट विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत आहे. नागराज मंजुळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हा सिनेमा 6 मे रोजी 'झी 5' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

* बेक्ड सीझन 3 (Baked Season 3)

बेक्ड सीझन 3 (Baked Season 3) ही तीन मित्रांची गोष्ट आहे. या सीझनमध्ये तीन मित्रांची सहल पाहायला मिळणार आहे. विश्वजॉय मुखर्जी यांनी या सीरिजचे दिग्दर्शन केले आहे. तर या सीरिजमध्ये प्रणय मनचंदा, शंतनू अनाम, माणिक पपनेजा आणि कृती विज मुख्य भूमिकेत आहेत. ही वेबसीरिज 2 मे ला वूटवर रिलीज होणार आहे.

* थार (Thar)

राज सिंह चौधरी लिखित आणि दिग्दर्शित 'थार' चित्रपटामध्ये अनिल कपूर, हर्षवर्धन कपूर आणि फातिमा सना शेख प्रमुख भूमिकेत आहेत. या अॅक्शनचा तडका असलेल्या सिनेमाची निर्मिती अनिल कपूर आणि हर्षवर्धन कपूर यांनी केली आहे. हा सिनेमा 6 मे रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे

Bollywood Movies
Shahrukh Kajol: शाहरुख आणि काजोल 7 वर्षानंतर पुन्हा दिसणार 'या' चित्रपटात एकत्र!

* स्टोरिज ऑन द नेक्स्ट पेज (Stories on the next Page)

स्टोरिज ऑन द नेक्स्ट पेज या वेब सीरिजचे दिग्दर्शन बृंदा मित्रा यांनी केले आहे. या सीरिजमध्ये अभिषेक बॅनर्जी, दितिप्रिया रॉय, नमित दास, भूपेंद्र जादावत, विभा आनंद, रेणुका शहाणे, राजेश्वरी सचदेव आणि सय्यद रझा मुख्य भूमिकेत आहेत. ही सीरिज 6 मे ला 'डिज्नी प्लस हॉटस्टार'वर रिलीज होणार आहे.

* पेट पुराण (Pet Puran)

'पेट पुराण' ही वेबसीरिज जोडप्यांना कराव्या लागणाऱ्या संघर्षावर भाष्य करणारी आहे. या वेबसीरिजमध्ये सई ताम्हणकर आणि ललित प्रभाकर मुख्य भूमिकेत आहेत. ही वेब सीरिज प्रेक्षक 6 मे पासून 'सोनी लिव्ह' या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.