ज्येष्ठ अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरेंचा मुलगा प्रियांक शर्माच अभिनंदन करण्याची आली वेळ

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 24 डिसेंबर 2020

ज्येष्ठ अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा प्रियांक शर्मा यांच अभिनंदन करण्याची वेळ आली आहे कारण तो लवकरच आपली मैत्रीण शाझा मोरानीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे.

नवी दिल्लीः २०२० या वर्षात अनेक सेलिब्रिटींनी लग्नगाठ बांधली.  ज्येष्ठ अभिनेत्री पद्मिनी कोल्हापुरे यांचा मुलगा प्रियांक शर्मा यांच अभिनंदन करण्याची वेळ आली आहे कारण तो लवकरच आपली मैत्रीण शाझा मोरानीसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. प्रियांक आणि शाझा एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या साखरपुड्यातील एक फोटो इंटरनेटवर प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे.

'जगातील माझे आवडते दोन व्यक्ती आहे, "या दोघांबद्दल मला खूप आनंद झाला आहे! जगातील माझे दोन फेवरेट लोकं लग्न करीत आहेत. याचा मला आनंद झाला आहे. श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत कपूरने साखरपुड्यातील फोटो सोशल मीडियावर शेअर करून लव्हबर्ड्सचं अभिनंदन केलं. 

कोण आहे प्रियांक शर्मा?

श्रद्धा कपूरचा चुलतभावा असलेल्या प्रियांकने रिवा किशनच्या 'सब कुशल मंगल' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. अक्षय खन्ना यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट 3 जानेवारी 2020 रोजी पडद्यावर आला. प्रियांकने अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी न्यूयॉर्कच्या ली स्ट्रासबर्ग संस्थेत अभिनयाचा अभ्यास केला आहे.

आणखी वाचा:

गौतम गंभीरचा स्तुत्य उपक्रम जन रासोई मध्ये मिळणार फक्त एक रूपयात जेवण - 

संबंधित बातम्या