'पाकिस्तानातही भाजप सरकार असेल'; कंगनाच्या नव्या दाव्याची चर्चा

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 10 मार्च 2021

बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री कंगना रणावत तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत असते.

मुंबई: देशात लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर भारताने शेजारील देशांना कोरोना लसीचा पुरवठा करण्य़ास सुरुवात केली होती. मात्र या देशांच्या यादीत पाकिस्तानचा सहभाग नव्हता. मात्र आता भारत United GAVI Alliance या करारातर्गंत पाकिस्तानला कोरोना लसींचा पुरवठा करणार आहे. यामुळे आता जगातील निम्म्याहून अधिक मुलांचं प्राणघातक आणि संसर्गजन्य रोगांविरोधात लसीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान अभिनेत्री कंगना रणावतने केलेलं ट्विट चर्चेचा विषय ठरलं आहे.

बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री कंगना रणावत तिच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सतत चर्चेत असते. नुकताच भारत पाकिस्तानला 4.5 कोटी लसींचा पुरवठा करणार आहे. याच पार्श्वभूमीवर भारत पाकिस्तानला लसींचा पुरवठा करणार असल्याचे समजल्यानंतर कंगनाने ट्विट करत पाकिस्तानतही भाजपचे सरकार स्थापन होणार असल्याचे म्हटले आहे.

कंगनाने ''या'' दिग्दर्शकाला चक्क देवता म्हटलं; जाणून घ्या

''म्हणजे मोदीजी म्हणत आहेत की, तो देखील (पाकिस्तान) भारताचाच भाग आहे. तिथे देखील लवकरच भाजपाचे सरकार असणार आहे. त्या देशातील दहशतवादी माझे नाहीत मात्र तेथील लोक आमचे आहेत. हा..हा..हा.. जबरदस्त'' अशा आशयाचे कंगनाने ट्विट केले आहे.

ख्वाजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातून 4.5 कोटी लसींचे डोस GAVI या करारातर्गंत मिळणार आहेत. त्यापैकी 1.6 कोटी लसींचे डोस जूनपर्य़ंत उपलब्ध होणार आहेत. पाकिस्तान माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, समितीला माहिती देत असताना पाकिस्तानचे सिनेटर मुशहिद सय्यद यांनी कोरोना लसींचे डोस कोठुन येणार आहेत यासंबंधी विचारणा केली होती. यावेळी पाकिस्तानच्या आरोग्य सचिवांनी पाकिस्तानला कोरोना लसींचे डोस सीरम इन्स्टिट्यूटडून मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

संबंधित बातम्या