पाकिस्तानी रॅपरने आलिया भट्टवर बनवलं रॅप; पहा Video

Pakistani rapper raps Alia Bhatt Watch the video
Pakistani rapper raps Alia Bhatt Watch the video

बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री आलिया भट्टने सगळ्यांची मने जिंकली आहेत. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत आलियाचे लाखो चाहते आहेत. आता पाकिस्तमधील एका रॅपरने आलिया भट्टवर एक खास रॅप तयार केलं आहे. त्याचं हे रॅप सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. दरम्यान आलियाने (Alia Bhatt) स्वत: यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Pakistani rapper raps Alia Bhatt Watch the video)

या पाकिस्तानी रॅपरचे नाव मोहम्मद शाह आहे. त्याने हा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम आकाऊंटवरुन पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये सुरुवातीला त्याचा मित्र त्याला म्हणतो, ‘आलिया भट्ट वर एक गाणं बनवं,’ त्यानंतर मोहम्मद आलियावर रॅप गाणं गाण्यास सुरुवात करतो. रॅपच्या शेवटी त्याचा मित्र त्याला आलियाला बॉयफ्रेंड आहे, आणि त्याने जान्हवी कपूरवर गाणं बनवायला ट्राय केलं पाहिजे. ‘हा व्हिडिओ पाहिल्यानंतर जान्हवी कपूरवर लवकरचं गाणं येणार असल्याची चर्चा सुरु झाल्या आहेत. What If चा पहिला भाग...,’ अशा आशयाचं कॅप्शन मोहम्मदने हे गाणं शेअर करत दिलं आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आलिया भट्ट स्वत:ला रोखू शकली नाही. तिने देखील यावर आपली कमेंट दिली आहे. आलियाने गली बॉयमधील ‘बहुत हार्ड’ हा डायलॉग म्हणत मोहम्मदवर स्तुती सुमनांचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर आलिया बॉयफ्रेंड रणबीर कपूर सोबत सुट्टी एन्जॉय करण्यासाठी मालदीवला गेली आहे. तर आलिया पहिल्यांदाच रणबीर कपूरबरोबर ‘ब्रम्हास्त्र’ चित्रपटात दिसणार आहे. एवढंच नाही तर आलियाला ‘गंगूबाई आणि ‘आरआरआर’ या चित्रपटांमध्ये देखील आपल्याला आगामी काळात पाहता येणार आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Muhammad Shah (@iamtheshah)


 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com