पॅनोरमा विभाग परीक्षक मंडळ सदस्यांचा माध्यमांशी संवाद

भारतीय पॅनोरमा चित्रपट विभागाच्या परीक्षक मंडळ सदस्यांनी इफ्फीत (IFFI) प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला.
पॅनोरमा विभाग परीक्षक मंडळ सदस्यांचा माध्यमांशी संवाद
Panorama section examiner board members interact with the media Dainik Gomantak

पणजी : भारतीय पॅनोरमा चित्रपट विभागाच्या परीक्षक मंडळ सदस्यांनी इफ्फीत (IFFI) प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. सदस्य मंडळाचे प्रमुख आणि सिनेनिर्माते एस. व्ही. राजेंद्रसिंग बाबू यांनी परीक्षक मंडळाने केलेल्या निवड प्रक्रियेबद्दल सांगितले. तसेच या निमित्ताने वैविध्यपूर्ण संस्कृती आणि वैशिष्‍ट्यपूर्ण आशयाची मोठी मेजवानी विविध चित्रपटांच्या रूपाने मिळाल्याचे स्‍पष्‍ट केले. परीक्षक मंडळातील सदस्यांमध्ये सिनेमॅटोग्राफर, चित्रपट समीक्षक, ऑडिओग्राफर इत्यादींसह सिनेउद्योगातील विविध क्षेत्रांतील व्यक्ती असल्याने प्रत्येक सदस्याकडे गुणवत्ता असल्याचे त्‍यांनी नमूद केले.

Panorama section examiner board members interact with the media
जाणून घ्या इफ्फीच्या ठिकाणाचा इतिहास..!

इफ्फीसाठी मोठ्या संख्येने येणाऱ्या चित्रपटांबद्दल बाबू म्हणाले, आपल्याकडे 30 पेक्षा अधिक राज्ये आहेत आणि ही यादी 21 पर्यंत मर्यादित ठेवणे खूप कठीण आहे. मंत्रालय आणि चित्रपट महोत्सव संचालनालयाला ती 30 ते 34 पर्यंत करण्याची विनंती आम्‍ही केली आहे. प्रादेशिक भाषांमध्‍ये उदयाला येणाऱ्या आशयसंपन्नतेवरही त्यांनी प्रकाश टाकला आणि ओटीटीवर प्रादेशिक चित्रपट प्रदर्शित करणे किती कठीण आहे, हे स्‍पष्‍ट केले.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com