Viral: परेश रावल जिंदा है! सोशल मीडियावर हा हॅशटॅग का होतोय ट्रेंड?

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 14 मे 2021

परेश रावल सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात आणि त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून ते चाहत्यांशी संवाद साधत असतात.

मागील काही दिवसात सोशियल मीडियावरती (Social Media) निधनाच्या अफवा फिरत आहेत. काही दिवसांपूर्वी जेष्ठ अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीच्या (Meenakshi Seshadri) निधनाची अफवा उडाली होती परंतु नंतर तिने आपल्या इंस्टाग्राम (Instagram) अकाउंटवर माहिती देत जिंवत असल्याचा खेळासा केला होता. महाभारतात भीष्म पितामहच्या भूमिकेतून लोकप्रिय झालेल्या मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांच्या निधनाची बातमी आली होती, त्यानंतर मुकेश खन्ना यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या वृत्ताचा इन्कार केला होता.(Paresh Rawal is alive Why is this hashtag becoming a trend on social media)

करण जोहर नंतर साजिद नाडियाडवाला सोबत कार्तिक आर्यन करणार काम

आज एका पोस्टमध्ये परेश रावल (Paresh Rawal) यांच्या निधनाची अफवा उठली होती, या अफवेवर जेष्ठ अभिनेते परेश रावल यांनी मजेदार उत्तर दिले. ज्या अकॉउंटवरून परेश रावल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली त्या अकॉउंटचे नाव हास्य लाफ्टर हाऊस असे आहे. आज, 14 मे 2021 रोजी सकाळी 7 वाजता चित्रपट श्रुष्टीतील परेश रावल यांचे निधन झाले अशी पोस्ट त्या अकॉउंटवर केली होती. चित्रपटसृष्टीचा भाग असलेले परेश रावल आता आपल्यासोबत नसल्याची पोस्ट पुन्हा ट्विट करत परेश रावल यांनी लिहिले. तुमच्या गैरसमजाबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो 7 वाजल्यानंतरही झोपलो होतो. 

 

परेश रावल सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असतात आणि त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून ते चाहत्यांशी संवाद साधत असतात. सद्य मुद्द्यांवरही ते जोरदार टीका करत असतात. चित्रपटांविषयी बोलताना ते फरहान अख्तरच्या तुफान चित्रपटात बॉक्सिंग कोचच्या भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट 21 मे रोजी अॅमेझॉन प्राइमवर  प्रदर्शित होणार होता, परंतु सध्याच्या परिस्थितीमुळे त्याचे प्रकाशन पुढे ढकलण्यात आले आहे.

 

संबंधित बातम्या