"तुमच्या आईवडिलांचं प्रेत नदीच्या पाण्यावर तरंगतांना दिसलं तर?"

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 13 मे 2021

कोविडमुळे मरणाऱ्या लोकांचा अंत्यविधी करण्यासाठी स्मशानात जागा नाही म्हणून आता त्यांचे मृतदेह नदीत टाकले जात आहेत. याविषयावर आता बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रानेही आपला संताप व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसांत बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश च्या नद्यांमध्ये काही मृतदेह वाहात असल्याचे आढळले, यामुळे देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे मृतदेह कोविड रूग्ण असल्याचे म्हटले जात आहे. परंतु अद्याप याबाबत कोणतेही स्पष्टिकरण देण्यात आले नाही. हे प्रशासनाचे अपयश आहे की, कोविडमुळे मरणाऱ्या लोकांचा अंत्यविधी करण्यासाठी स्मशानात जागा नाही म्हणून आता त्यांचे मृतदेह नदीत टाकले जात आहेत. याविषयावर आता बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रानेही आपला संताप व्यक्त केला आहे.

Radhe Release Time: कुठे आणि कधी प्रदर्शित होणार सलमान खानचा राधे; जाणून घ्या

परिणितीने असं कृत्य करत असलेल्या लोकांची तुलना राक्षसांशी केली आहे. "या कोरोना साथीच्या काळात लोकांची खरी माणुसकी समोर आली आहे. तुम्हाला कसं वाटेल जेव्हा त्या नदीच्या काठावर आपण आपल्या आईला किंवा नातेवाइकांना असं पाण्यावर तरंगतांना पाहिले तर काय वाटेल? याची कल्पनाही करता येणार नाही," असे परिणीतीने आपल्या एका ट्विटमध्ये लिहिले आहे.

 

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर सोशल मीडियावर अनेकदा देश, राजकारण आणि जनकल्याण इत्यादि संबंधित वेगवेगळ्या विषयांवर आपले मत मांडत असतो. आता फरहान अख्तरने आपल्या ट्विटद्वारे पुन्हा एकदा देशातील कोरोना साथीच्या काळात यंत्रणा बिघडल्याचा आरोप केला आहे. नद्यांमध्ये मृतदेह वाहनाच्या वृत्ताविषयी त्याने एक ट्विट केले आहे. "नदी किनारी तरंगत असलेल्या मृतदेहांची बातमी ही खूपच हृदयद्रावक अशी आहे. आपण कोरोनाला एक ना एक दिवस नक्की हरवू. पण सध्याचं याविरोधात लढण्यात यंत्रणेला आलेलं अपयश असून त्याला व्यवस्था जबाबदार आहे. तोवर सर्वांनी हे ध्यानात ठेवलं पाहिजे की कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही," असे ट्विटमध्ये त्याने लिहिले आहे.

प्रशासनाचा तपास सुरू आहे
कोरोनाव्हायरसच्या वाढत्या घटनांमध्ये ही बातमी धक्कादायक आहे. बिहारमधील गंगा नदीत सुमारे 10 ते 12 मृतदेह वाहताना दिसले. या घटनेनंतर प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली आहे. दरम्यान आम्ही या मृतदेहांच्या अंत्यसंस्कारांची व्यवस्था करीत आहोत. हे मृतदेह उत्तर प्रदेशातून आले आणि हे मृतदेह कोरोना रुग्णांचेही असू शकतात, असा आरोपही बक्सरच्या एसडीओने प्रशासनाने केला आहे. दरम्यान, आज उत्तर प्रदेश आणि बिहार नंतर मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील नदीतून काही मृतदेहही सापडल्याची बातमी समोर आली आहे. केन नदीच्या काठी वसलेल्या नंदपूर गावातल्या लोकांना हे मृतदेह वाहताना दिसले. या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. सध्या हा मृतदेह कोठून आला याचा प्रशासन तपास करत आहे.

कोरोनाचा संसर्ग पाण्यातून होत नाही 

बॉलिवूड कडून मदतीचा हात 
कोरोनामुळे प्रत्येकजण अस्वस्थ आहे. कुठेतरी बेडची कमतरता आहे तर काही ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता आहे. अशा परिस्थितीत कोरोना पीडित आणि साथीच्या आजाराने पीडित व्यक्तींच्या मदतीसाठी बर्‍याच चित्रपट स्टारांनी हात वर केले. सोनू सूद, सलमान खान, परिणीती चोप्रा, प्रियांका चोप्रा, अमिताभ बच्चन यासारखे अनेक सेलिब्रिटी कोरोनामुळे त्रस्त लोकांना प्रत्येक प्रकारे मदत करण्यात व्यस्त आहेत.

संबंधित बातम्या