Parineeti-Raghav Engagement: सर्वांसमोर लिप-लॉक करताना दिसले परिणिती-राघव, साखरपुड्यातील Video Viral

परिणिती चोप्रा आणि राघव चड्ढा यांचा साखरपुडा नुकताच पार पडला असून या साखरपुड्यातील न पाहिलेला व्हिडिओ समोर आला आहे.
Parineeti-Raghav Engagement
Parineeti-Raghav EngagementDainik Gomantak

Parineeti Chopra And Raghav Chadha Engagement Viral Video: बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्राने आणि आम आदमी पार्टीचे खासदार राघव चड्ढा यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. 13 मे रोजी दिल्लीमध्ये मोठ्या थाटामाटात साखरपुडा केला.

काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत त्यांचा साखरपुडा पार पडला. आता त्यांच्या साखरपुड्यातील एक न पाहिलेला व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

नुकताच सोशल मीडियावर परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा यांच्या साखरपुड्यामधील एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा हे धमाल करताना दिसत आहेत.

या व्हिडीओमध्ये (Video) त्यांच्या साखरपुड्याचे डेकोरेशन देखील दाखवण्यात आले आहे. आधी राघव आणि परिणिती केक कट करतात, एकमेकांना भरवतात आणि व्हिडीओच्या शेवटी ते एकमेकांना किस करतांना दिसत आहे. या व्हिडीओची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे.

दरम्यान, काल एका व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतले होते. दोघे आनंदात एकमेकांनासोबत सोहळ्यातील संगीताचा आस्वाद घेत होते. परिणीती राघव यांना मिठी मारून उभी होती. तिच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.

ते दोघे गाण्यामध्ये रंगले होते, परिणीती राघव यांना पाहून 'वे माही' गाणं गात होती तेवढ्यात राघव यांनी सर्वासमोर परिणीतीला किस केले. 

दोन महिन्यांपूर्वीच राघव - परिणिती एका ठिकाणी स्पॉट झाले होते तेव्हाच सोशल मिडीयावर या नात्याच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या होत्या. पण दोघांच्या नात्याविषयी कुठलीच अधिकृत माहिती मिळत नव्हती.

परिणिती आणि राघव चड्ढा एकमेकांना कॉलेजपासून ओळखत असल्याची माहिती मिळतेय. दोघे परदेशातही एकत्र शिक्षण घेते होते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये ते दोघं एकत्र होते आणि तेव्हापासून ते एकमेकांचे मित्र होते असे कळते आहे

राघव- परिणितीच्या नात्याची सुरूवात नेमकी कधी झाली? हे सांगता येत नसले तरी रेशमी बंध जुळण्याची सुरूवात परदेशातल्या त्यांच्या शिक्षणापासुन झाली असं म्हणता येईल.पण राघव चढ्ढा जेव्हा पंजाबच्या दौऱ्यावर होते तेव्हा परिणितीचं शूटही तिथेच सुरू होतं, याचवेळी दोघांनी एकमेकांना पसंत केलं अशीही चर्चा आहे.

दोघांनी यावर बोलणं पूर्णत: टाळलं होतं. गेले काही दिवस ही सगळी चर्चा सुरू असताना आता दिल्लीच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये आज संध्याकाळी साखरपुड्याचा हा सोहळा पार पडला आहे.

अजुनतरी विवाह सोहळ्याची तारीख कळू शकली नसली तरी साखरपुडा पार पाडल्यानंतर नक्कीच परिणिती आणि राघव यांच्या बोहल्यावर चढण्याची तारीख दोघांच्या चाहत्यांना समजू शकेल.

या सोहळ्यात सिने जगतातील आणि राजकारणातील जवळपास 100 पाहुणे सहभागी झाले होते. लंडनहून परिणीतीची चुलत बहीण प्रियांका चोप्राही शनिवारी दिल्लीत पोहोचली.

करण जोहर आणि मनीष मल्होत्राही या सोहळ्याला उपस्थित होते. गेल्या काही महिन्यांपासून परिणीती आणि राघवच्या डेटींगच्या बातम्या सतत येत आहेत. 

दोघेही यावर कधीच उघडपणे बोलले नसले तरी ते कधी लंच तर कधी एकत्र जेवण करताना दिसले. याशिवाय दोन्ही आयपीएल मॅचेसही एकत्र एन्जॉय करताना दिसले. परिणीती 9 मे रोजी तिचा मित्र राघव चंदासोबत दिल्लीला पोहोचली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com