Pariniti Chopada - Raghav Chadha : परिणीती चोप्रा आणि खा. राघव चढ्ढा एकमेकांना डेट करतायत? मुंबईत दिसले एकत्र...

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या रिलेशनशीपची चर्चा सध्या सुरू आहेत.
Pariniti Chopada 
Raghav Chadha
Pariniti Chopada Raghav Chadha Dainik Gomantak

राजकीय नेते आणि बॉलिवूडच्या अभिनेत्री यांच्या अफेअरच्या गोष्टी आपण वरचेवर ऐकत असतो . यातल्या काही कपल्सच्या फक्त चर्चा होतात, काहीजणांची जन्मभराची गाठ बांधली जाते तर काही जणांचं ब्रेक-अप होतं. अशीच एक बातमी समोर आली असून आम आदमी पार्टीचे प्रसिद्ध नेते आणि पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा आणि बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हे मुंबईत एकत्रित स्पॉट झाले आहेत.

बुधवारी हे दोघं एकत्रित डिनर घेताना दिसून आले होते, तर आज त्यांनी एकत्रित लंच केल्याचं समोर आलं. या सलग भेटींमुळे या दोघांचं अफेअर सुरू आहे का या चर्चेला जोरदार उधाण आलं आहे.

परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चड्डा या दोघांनी बुधवारी दुपारी एकत्रित लंच केलं. मुंबईतील एका हॉटेलमध्ये लंच केल्यानंतर राघव चढ्ढा हे पहिल्यांदा बाहेर आले आणि काही वेळांनी परिणीता बाहेर आली. परिणीता या लंच डेटला कॅज्युअल लूकमध्ये पोहोचली होती. तिने काळ्या क्रॉप टॉपसह काळी पँट परिधान केली होती.

बुधवारी संध्याकाळी दोघेही पांढऱ्या शर्टमध्ये दिसले होते. हा फोटो पाहिल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनीही हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत का असा प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. आणि आज लगेच दुपारी हे चित्र समोर आलं. 

जानेवारी महिन्यात अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि खासदार राघव चढ्ढा या दोघांना 'इंडिया यूके आउटस्टँडिंग अचिव्हर ऑनर्स' दोघांना सन्मान मिळाला . हा सन्मान मिळवणारे हे पहिलेच भारतीय आहेत

नॅशनल इंडियन स्टुडंट्स अँड अॅल्युमनी युनियनच्या (NISAU) वतीनं ब्रिटीश कौन्सिल इन इंडिया आणि ब्रिटनच्या आंतरराष्ट्रीय व्यापार विभाग (DIT) यांच्याकडून हा सन्मान देण्यात आला होता. ब्रिटीश विद्यापीठात शिकणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी विशेषत: हा सोहळा पार पडला. 

Pariniti Chopada 
Raghav Chadha
Virat - Anushka Viral Video : चालताना अवघडलेल्या अनुष्काचा गाऊन विराटने सांभाळला...नेटीजन्सकडून कौतुक

परिणीती चोप्रा ब्रिटनच्या मँचेस्टर स्कूलमध्ये शिकलीय. तर राघव चढ्ढा यांनी जगप्रसिद्ध लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून शिक्षण घेतले आहे.

परिणीती आणि राघव दोघेही अभ्यासात हुशार होते आणि त्यांच्या वर्गात टॉपरही होते. दोघांच्या वैवाहिक स्थितीबद्दल सांगायचे तर परिणीती सध्या सिंगल आहे आणि 34 वर्षीय राघव चढ्ढा हे अद्याप अविवाहित आहेत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com