Paris Fashion Week: ऐश्वर्याचा ग्लॅमरस  रॅम्पवॉक ,पहा व्हिडीओ
Paris Fashion Week: Aishwarya's glamorous ramp walk, watch video Insatgram/@aishwaryaraibachchan_arb___

Paris Fashion Week: ऐश्वर्याचा ग्लॅमरस रॅम्पवॉक ,पहा व्हिडीओ

ऐश्वर्या पॅरिस फॅशन वीकमध्ये 2021 मध्ये सहभागी होण्यासाठी पॅरिसला आली आहे.

बॉलिवूडची (Bollywood) प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) तिच्या चाहत्यांच्या (Fan) मनावर राज्य करते. ऐश्वर्याच्या सौंदर्याचे परदेशात सुद्धा चाहते आहेत. अलीकडेच ऐश्वर्या राय बच्चन पॅरिस फॅशन विकमध्ये पांढऱ्या ड्रेसमध्ये रॅम्पवॉक (Ramp walk) करतांना दिसली आहे. ऐश्वर्या रायचा लुक पॅरिस फॅशन वीकमध्ये (Paris Fashion Week) परीपेक्षा कमी दिसत नव्हता. तिने पुन्हा एकदा तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केले आहे.

* ऐश्वर्या परी सारखी दिसत होती

येथे ऐश्वर्याने न्यूड मेकअपसह तिचा लुक वेगळ्या पद्धतीने सादर केला आहे. याच कारणामुळे ऐश्वर्याने तिच्या स्टाईलने सोशल मिडियावर फोटो शेअर केले आहे. ऐश्वर्या राय बच्चन सध्या अभिषेक बच्चन आणि आरध्यासोबत पॅरिसमध्ये आहे. ऐश्वर्या पॅरिस फॅशन वीकमध्ये 2021 मध्ये सहभागी होण्यासाठी येथे आली आहे. या दरम्यान, अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये रॅम्प वॉक केला आहे. या दरम्यान तिने फोटो आपल्या सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. प्रत्येकजन ऐश्वर्याच्या सौंदर्यतेचे कौतुक करत आहे. तिचे फोटोपाहून ती 47 वर्षांची असल्याचे दिसत नाही.

* ऐश्वर्या राय लवकरच गुलाब जामून या चित्रपटात दिसणार

ऐश्वर्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिच्या आगामी तामीळ चित्रपटाबद्दल बरीच चर्चेत आहे. ती लवकरच पोन्नियिन सेल्वान मध्ये दिसणार आहे. सर्वांच्या लक्ष या चित्रपटाकडे लागले आहे . आशा आहे की या चित्रपटात ऐश्वर्याचे विशेष रूप पाहायला मिळेल. शिवाय ऐश्वर्या अनुराग कश्यपच्या गुलाब जामून या चित्रपटातही दिसणार आहे.

Related Stories

No stories found.