Pathaan: ‘पठाण’ साठी कतरिनाने लिहिली एक खास पोस्ट, म्हणाली...

कतरिना कैफने पठाणसाठी एक खास पोस्ट शेअर करत प्रेक्षकांना एक विनंती केली आहे.
Pathaan
PathaanDainik Gomantak

Pathaan Movie: बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान याचा बहुप्रतीक्षित ‘पठाण’ हा चित्रपट आज चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा चित्रपट सोशल मिडियावर चांगलाच चर्चेत होता.

शाहरुख खान खुप दिवसानंतर रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अखेर चाहत्यांची ही प्रतीक्षा आज संपली आहे. विशेष म्हणजे काही ठिकाणी सकाळी 6 वाजल्यापासून या चित्रपटाच्या शोला सुरुवात झाली आहे. कतरिना कैफने एक खास पोस्ट शेअर करत प्रेक्षकांना एक विनंती केली आहे.

‘पठाण’ चित्रपटातून शाहरुख खान तब्बल 4 वर्षांच्या ब्रेकनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘पठाण’ ची क्रेझ पाहता हा चित्रपट लीक होण्याची शक्यता देखील दर्शवली जात आहे. अनेकदा प्रेक्षक चित्रपटगृहातून बाहेर पडले की, लगेच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करतात.

अशावेळी ते चित्रपटातील (Movie) सस्पेन्स आणि कथानकाचा काही भाग लगेच सांगून टाकतात. यासंदर्भात आता चित्रपटाच्या कास्टसह अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif) हिने देखील प्रेक्षकांना एक विनंती केली आहे.

katrina kaif post
katrina kaif postDainik Gomantak
Pathaan
Jackie shroff : जॅकी श्रॉफ यांच्या हातात नेहमी कसले झाड असते?

इन्स्टाग्रामवर कतरिनाने एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना ‘पठाण’साठी खास विनंती केली आहे. तिने चाहत्यांना आपल्या सोशल मीडियावर ‘पठाण’ चित्रपटाचा स्पॉयलर देऊ नका, अशी विनंती केली आहे. यासाठी कतरिना कैफ हिने ‘टायगर’ मधील ‘झोया’ अवतार धरण केला आणि प्रेक्षकांना स्पॉयलर देऊ नका असे सांगितले आहे.

कतरिनाने तिच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, ‘माझा मित्र पठाण एका धोकादायक मिशनवर आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने तुम्ही याबाबत काहीही माहिती उघड करू नका. हे अत्यंत महत्त्वाचे मिशन आहे.

आता तुम्ही सर्वजण देखील या मिशनचा भाग आहात. झोया. ’सोशल मिडियावर ‘पठाण’ची जोरदार चर्चा सुरू आहे. शाहरुख खानचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर (Box Office) चांगलीच धुमाकुळ घालणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com