Pathan : पठाणने मोडला परदेशातला केजीएफचा रेकॉर्ड..

शाहरुख खानचा पठाणने आता परदेशात झालेला केजीएफचा रेकॉर्ड मोडला आहे.
Pathan Breaks Record
Pathan Breaks RecordDainik Gomantak

Pathan Breaks Record: शाहरुख खानचा 'पठाण' हा चित्रपट 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामुळे चाहत्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. शाहरुखने तब्बल चार वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. 

आता 'पठाण'ने केजीएफचा रेकॉर्ड मोडला आहे. चित्रपटाची आगाऊ बुकिंग सुरू आहे आणि सुरुवातीचा ट्रेंड उत्कृष्ट आहे. पठाण हा एक अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे, पठाणचे दिग्दर्शन सिद्धार्थ आनंद यांनी केले आहे. यात दीपिका पदुकोण देखील आहे, या चित्रपटाची रिलीजच्या आधीच मोठी चर्चा झाली आहे.

यूएई, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियामध्ये 'पठाण'चे अॅडव्हान्स बुकिंग सुरू आहे. पिंकविलाच्या म्हणण्यानुसार, पहिल्या दिवशी यूएईमध्ये या चित्रपटाची 3500 तिकिटांची $50,000 इतकी विक्री झाली आहे. यावरुन शाहरुखचा पठाण हीट होणार हे सहज लक्षात येते. पठाणने ऑस्ट्रेलियात पहिल्या दिवसाची 3,000 तिकिटे विकली, ज्याची किंमत 65,000 इतकी आहे. 

जर्मनीमध्ये पाच दिवसांच्या सुरुवातीच्या वीकेंडसाठी 8500 तिकिटांची विक्री झाली आहे. त्यापैकी 4000 पहिल्या शोची आहेत.थोडक्यात एकुण कलेक्शन चांगले आहे . सुरुवातीच्या ट्रेंडनुसार पठाण याआधीच्या 'दिलवाले' चित्रपटाचा विक्रम सहज मागे टाकू शकतो.

Pathan Breaks Record
Rakhi Sawant : राखी एकदाची संसाराला लागली..आदिल म्हणाला माझी पप्पुडी..

पठाण हा एक स्पाय-थ्रिलर चित्रपट आहे ज्यामध्ये शाहरुख खान मुख्य भूमिकेत आहे.'बँग बँग' आणि 'वॉर' ओळख मिळालेला सिद्धार्थ आनंद याने याचे दिग्दर्शन केले आहे.

 या नवीन चित्रपटात दीपिका पदुकोण आहे आणि हा तिच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा चित्रपट आहे. याशिवाय जॉन अब्राहम आणि सलमान खान या कलाकारांचा समावेश आहे. पठाण 25 जानेवारीला पडद्यावर येणार आहे. बघुया पठाणच्या अजुन काय बातम्या समोर येतात

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com