Pathan: शाहरुख खानचा 'पठाण' प्रीमियम फॉरमॅटमध्ये दाखवला जाणार, चित्रपटगृहांमध्ये सकाळी 6 वाजल्यापासून बघता येणार

शाहरुख खानचा पठाण प्रिमीयम फॉरमॅटमध्ये दाखवता येणार असुन सकाळी 6 वाजल्यापासुन प्रेक्षकांना बघता येणार आहे
Shah Rukh Khan
Shah Rukh KhanDainik Gomantak

Pathan will realease in Primium Format: अभिनेता शाहरुख (Shah Rukh Khan) खानचा बहुचर्चित आणि वादग्रस्त ठरलेला पठाण हा चित्रपट 25 जानेवारीला रिलीज होत आहे. हा चित्रपट प्रिमीयम फॉरमॅटमध्ये दाखवला जाणार आहे म्हणजेच सकाळी 6 वाजल्यापासुन हा चित्रपट प्रेक्षकांना पाहता येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार शाहरुख खान त्याचा वर्षातील सर्वात मोठा चित्रपट 'पठाण' घेऊन थिएटरमध्ये दाखल होणार आहे. रिलीजपूर्वीच या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. पठाणला प्रीमियम फॉरमॅटमध्ये दाखवण्यात येणार असल्याच्या बातम्या आहेत. तसेच त्याच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे.

शाहरुख खान चार वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर 'पठाण' चित्रपटातून चित्रपटात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. आणि असे दिसते की शाहरुखला मोठ्या पडद्यावर पाहण्याची अपेक्षा दिवसेंदिवस वाढत आहे. 

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित, या चित्रपटात दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही प्रमुख भूमिका आहेत, प्रिमियम फॉरमॅटवर भारतात सकाळी 6 वाजता स्ट्रीम केला जाईल.

Shah Rukh Khan
Selfie Trailor : अक्षय कुमार आणि इमरान हाश्मीच्या 'सेल्फी'चा धमाकेदार ट्रेलर रिलीज

मिळालेल्या ताज्या माहितीनुसार यशराज फिल्म्स (YRF) ने IMAX 2D, CGV 4DX 2D, D-Box 2D, PVR P [XL] आणि CGR ICE 2D सारख्या प्रीमियम फॉरमॅटमध्ये 'पठाण' रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई थिएटरचे मालक मनोज देसाई यांनी पाच वर्षांनंतर 'पठाण' दोन्ही Gaiety-Galaxy मध्ये प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com