Pathan Advance Booking :'पठाण'चं अॅडव्हान्स बुकींग जोरात, रेकॉर्ड मोडण्यासाठी चित्रपट सज्ज...

शाहरूख खानच्या पठाणचे अॅडव्हान्स बुकींग सुरू झाले असुन एक नवीन रेकॉर्ड बनवण्यासाठी चित्रपट सज्ज झाला आहे.
Pathan Advanced Booking
Pathan Advanced BookingDainik Gomantak

गेले काही दिवस शाहरुख खानच्या चित्रपटाने आजवरच्या इतिहासातील वादग्रस्त चित्रपटांचे रेकॉर्ड तोडले आहे असंच म्हणावं लागेल. कारण गेले कित्येक दिवस या चित्रपटावर एवढे वाद झाले आहेत कि त्याचा एक वेगळा इतिहास होऊ शकेल. पण आता हा चित्रपट एक नवा रेकॉर्ड बनवत आहे.

पठाणच्या बेशरम रंग या गाण्यातील दीपिका पदुकोणच्या भगव्या बिकिनीवरून बराच गदारोळ झाला होता. एवढेच नाही तर गुजरातमधील बजरंग दलाच्या लोकांनी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होऊ देणार नसल्याचेही सांगितले आहे. मात्र, या सगळ्यामध्ये पठाणचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. 

शाहरुख खानच्या पठाण या चित्रपटाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत होते. पठाण यांच्या तिकिटांच्या आगाऊ बुकिंगचीही चाहते वाट पाहत आहेत. यशराज बॅनरखाली बनलेल्या पठाण चित्रपटाचे अॅडव्हान्स बुकिंग सुरू झाले आहे. 

या चित्रपटाच्या तिकिटांचे आगाऊ बुकिंग २० जानेवारीपासून होणार होते पण प्रत्यक्षात भारतात आजपासून सुरू झाले आहे. सुरुवातीच्या आकड्यांनुसार, चित्रपटाने आतापर्यंत 3.68 कोटी रुपयांचे आगाऊ बुकिंग केले आहे. हा आकडा खूप मोठा असल्याचं मानलं जात आहे.

Pathan Advanced Booking
Shraddha Kapoor : "तू झुठी मै मक्कार"चा ट्रेलर पाहुन श्रद्धाने फॅन्सना विचारला अजब प्रश्न...

या अॅडव्हान्स बुकिंगमध्ये IMAX, 4DX, 2D तिकिटांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत 'एक था टायगर', 'टायगर जिंदा है' आणि 'वॉर' यांसारख्या चित्रपटांनंतर यशराज बॅनरच्या स्पाय युनिव्हर्सच्या या चौथ्या चित्रपटासाठी चाहते खूप उत्सुक दिसत आहेत. 

अॅडव्हान्स बुकींगमध्ये पहाटे चित्रपटाचा रेकॉर्ड पाहता हा चित्रपट पहिल्याच दिवशी बंपर ओपनिंग घेऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. रिपोर्ट्सनुसार, हैदराबाद, दिल्ली आणि मुंबईतील काही शो आधीच विकले गेले आहेत. बहिष्काराचा ट्रेंड असूनही पठाण आगाऊ बुकिंग खूप चांगले करत आहे. 

केवळ भारतातच नव्हे तर पठाणनेपरदेशातही अॅडव्हान्स बुकिंग करून भरपूर कमाई केली आहे. पठाण हा चित्रपट 25 जानेवारीला देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

यशराज फिल्म्स दिग्दर्शित या चित्रपटात शाहरुख खान सोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील दिसणार आहेत. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com