आता लोक थेट सोनू सूदच्या घरी पोहोचले...पहा व्हिडीओ

दैनिक गोमंतक
बुधवार, 5 मे 2021

मदत मागण्यासाठी लोक सोनू सूदच्या घरा पर्यंत पोहोचल्याचे पाहायला मिळते आहे.

कोरोनाची दुसरी लाट भारतासाठी मोठी आणि गंभर समस्या बनली आहे. आतापर्यंत कोट्यवधी लोकांना या विषाणूची लागण झाली असून लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. या काळात अभिनेता सोनू सूद गरजूंना मदत करण्याचे काम करताना दिसतो आहे. केवळ सोशल मीडियावरच नाही तर लोक आता मदत मागण्यासाठी सोनू सूदच्या घरा पर्यंत पोहोचल्याचे पाहायला मिळते आहे.  अलीकडेच सोनू सूदच्या घराबाहेरचा एक व्हिडिओही समोर आला आहे. (People rushed to Sonu Sood's house to ask for help)

समोर आलेल्या व्हिडीओमधून असे दिसून येते की काही लोक मदत मागण्यासाठी सोनू सूदच्या (Sonu Sood)घराबाहेर पोहोचले आहेत. ज्यात महिलांचा समावेश होता.विरल भयानी यांनी सोनू सुदच्या घराबाहेरील व्हिडिओ शेअर केला आहे. "सोनू सुदच्या घराबाहेर मदत मागण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक जमले आहेत. आता सोनूच आहे ज्याच्याकडून लोक मदतीची अपेक्षा करत आहेत. इतर कोणत्याही मदतीपेक्षा सोनू सुदची मदत लोकांपर्यंत लवकर पोहोचते. तो असा माणूस आहे जो महामारीच्या या काळात आपल्या देशातील लोकांसोबत उभा आहे." असे म्हणत विरल भयानी (Viral Bhayani) यांनी एक व्हिडीओ ट्विट केला आहे.

या व्हिडीओ मध्ये सोनू सूद मदत मागण्यासाठी आलेल्या लोकांसोबत बोलताना दिसतो आहे. यावेळी लोक सोनू सुदच्या हातात मदतीसाठीचे निवेदन देताना दिसता आहेत. यावेळी सोनू सुद मदतीचे (Help) आश्वासन देताना दिसून येतो आहे.

संबंधित बातम्या