Pervez Musharraf : या भारतीय अभिनेत्यावर 'परवेज मुर्शरफ'यांनी घातली होती बंदी...

एका बॉलिवूड अभिनेत्याने अशी गोष्ट केली होती की पाकिस्तानचे तेव्हाचे राष्ट्राध्यक्ष मुर्शरफ यांनी त्यांच्यावर बंदी घातली होती.
Pervez Musharraf
Pervez MusharrafDainik Gomantak

पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ यांचे रविवारी (5 फेब्रुवारी) सकाळी निधन झाले. पाकिस्तानच्या स्थानिक माध्यमांनी याला दुजोरा दिला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर अनेक दिवसांपासून संयुक्त अरब अमिरातीतील अमेरिकन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. रिपोर्ट्सनुसार, तो अमायलोइडोसिस नावाच्या आजाराशी झुंज देत होते. 

मुशर्रफ यांचा बॉलिवूडशीही संबंध आहे.असा एक किस्सा आहे ज्यात मुशर्रफ खूप चिडले होते. त्यांच्या मृत्यूनंतर, मुशर्रफ आणि बॉलीवूड अभिनेता फिरोज खान यांचा एक किस्सा लोकांच्या मनात पुन्हा ताज्या होत आहे. चला जाणुन घेऊया काय आहे हा किस्सा?

फिरोज खान हे नेहमीच त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जायचे. त्यामुळे परवेझ मुशर्रफ यांनी त्यांच्यावर पाकिस्तानात बंदी घातली होती. खरं तर, फिरोज जेव्हा लाहोरला त्यांचे भाऊ अकबर खानचा चित्रपट ताजमहाल प्रदर्शित करण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील मुस्लिमांच्या स्थितीवर भाष्य केले होते. 

यावेळी फिरोज खान यांनी भारताचे कौतुक करताना म्हटले की, 'भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. आमच्या देशात मुस्लिम पुढे जात आहेत, प्रगती करत आहेत. आमचे राष्ट्रपती मुस्लिम आहेत, पंतप्रधान शीख आहेत. इस्लामच्या नावावर पाकिस्तानची निर्मिती झाली, पण आजची परिस्थिती बघा लोक एकमेकांना मारत आहेत. 

Pervez Musharraf
Pathan Collection Day 9 : 'पठाण'ची कोटींची उड्डाणं सुरूच...अमिरच्या 'दंगल'ला केले धोबीपछाड...

ज्या वेळी फिरोज यांनी या गोष्टी सांगितल्या त्या वेळी मनमोहन सिंग भारताचे पंतप्रधान होते आणि एपीजे अब्दुल कलाम राष्ट्रपती पदावर होते. याशिवाय ते म्हणाले होते की, 'मी येथे स्वतःहून आलेलो नाही. मला इथे येण्याचे निमंत्रण दिले होते. आमचे चित्रपट इतके प्रभावशाली आहेत की तुमचे सरकार त्यांना जास्त काळ रोखू शकत नाही. 

रिपोर्ट्सनुसार, त्यावेळी या कार्यक्रमात 100 हून अधिक लोक उपस्थित होते. त्यानंतर फिरोज खान यांच्या या वक्तव्यावर पाकिस्तानात मोठा गदारोळ झाला आणि मुशर्रफ यांनी त्यांच्यावर पाकिस्तानात बंदी घातली होती. पाकिस्तानमध्ये जाऊन तिथल्या राष्ट्राध्यक्षाला असं बोलणं खरंच एक मोठं धाडस होतं, फिरोज खान यांच्या धाडसाचे कौतुक करायला हवेच.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com