संदीप नहार आत्महत्या प्रकरण : पत्नी व सासू यांच्यावर गुन्हा दाखल 

Police have registered a case against Sandeep Nahar's wife and mother-in-law in connection with his suicide
Police have registered a case against Sandeep Nahar's wife and mother-in-law in connection with his suicide

केसरी आणि एमएस धोनी या चित्रपटात अभिनय केलेल्या संदीप नहारने सोमवारी मुंबईतील घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी आज संदीप नहारची पत्नी कांचन आणि सासू यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. मुंबईतील गोरेगाव पोलिसांनी संदीप नहारच्या आत्महत्येप्रकरणी संदीपची पत्नी आणि सासूवर कलम 306 नुसार गुन्हा दाखल केला असल्याची माहिती दिली आहे.

अभिनेता संदीप नाहर 15 फेब्रुवारी रोजी त्याच्या निवासस्थानी मृत अवस्थेत आढळला होता. संदीप नहारने आत्महत्या करून आपले जीवन संपवल्यानंतर त्याच्या वडिलांनी पोलीस तक्रार केली होती. आणि त्यानंतर पोलिसांनी कारवाई करत संदीपची पत्नी आणि सासूवर गुन्हा दाखल केला आहे. जीवन संपवण्यापूर्वी संदीप नहारने सोशल मीडियावरील फेसबुकवर आपण आत्महत्या करणार असल्याची पोस्ट शेअर केली होती. संदीपने यापूर्वी अक्षय कुमारच्या केसरी व सुशांत सिंग राजपूतने अभिनय केलेल्या एमएस धोनीः द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटात काम केले आहे. यातील सुशांत सिंग राजपूतने मागील वर्षाच्या 14 जून रोजी आपल्या मुंबईतील राहत्या घरी आत्महत्या केली होती.     

दरम्यान, संदीपने आत्महत्या करण्यापूर्वी मुंबईतील आपल्या संघर्षाची गोष्ट सोशल मीडियावरील फेसबुकवर पोस्ट केली होती. आणि यासह त्याने बॉलिवूडमधील राजकारणावर भाष्य केले होते. संदीपने शेअर केलेल्या या पोस्ट मध्ये बॉलिवूडमधील जीवन हे संपूर्णपणे खोटे असल्याचे म्हटले होते. याशिवाय आयुष्यात बरेच सुख आणि दु:ख पहिले. व प्रत्येक प्रॉब्लेमच सामना केला. मात्र आता सहन करण्याच्या पलीकडे गेल्याचे संदीपने पोस्ट मध्ये पुढे लिहिले होते. तसेच आत्महत्या करणे बरोबर नसल्याचे माहिती आहे. आणि आपल्याला जगायचे होते. परंतु रिस्पेक्ट, समाधान नाही मग जगण्याचा फायदा नसल्याचे म्हणत आपण आत्महत्या करत असल्याचा उल्लेख त्याने पोस्टमध्ये केला होता. याव्यतिरिक्त आपली पत्नी कांचन आणि तिची आई यांनी कधीच आपल्याला समजून घेतले नसल्याचे संदीप नहारने आपल्या पोस्ट मध्ये म्हटले होते. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com