पूजा बेदी नेटकऱ्यांकडून ट्रोल!

dainik gomantak
बुधवार, 20 मे 2020

‘तुझी गाडी, तुझे घर आणि व्यवसाय जरी गोव्यात नोंदीत असला तरी तू मूळची गोव्यातील नाहीस’, असे नेटकऱ्यांनी तिला फटकारले आहे. ‘गोवा सरकारने खरेतर या लोकांना राज्यात येण्यास परवानगीच देऊ नये.’ असेही ट्रोल केले गेले आहे.

पणजी, 

टाळेबंदीच्या काळात आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबत गोव्याला आलेल्या पूजा बेदीने केलेल्या ट्विटबद्दल तिला नेटकऱ्यांनी चांगलेच ट्रोल केले आहे. ‘तुझी गाडी, तुझे घर आणि व्यवसायाची गोव्यात नोंदीनी केली असली तरी तू मूळ गोव्यातील नाहीस,’ असे उत्तर एका नेटकऱ्याने तिला दिले आहे.
गोवा ‘ग्रीन झोन’मध्ये आल्यामुळे मुंबईतील टाळेबंदीला कंटाळून महाराष्ट्र शासनाकडून आवश्‍यक ती परवानगी घेऊन पूजा बेदी गोव्यात आली आहे. ती आपला नवरा मानेक याच्यासमवेत गोव्यात आली असली तरी तिला १४ दिवस कॉरंटाईनचा शिक्का हातावर घेऊन घरी बसावे लागले आहे. तिने केलेल्या ट्विटमध्ये लिहिले होते की, ‘आपण आपल्या होणाऱ्या नवऱ्याबरोबर गोव्याला आपल्या वाहनातून आली आहे. आपण आपल्या गोव्यातील घरी परतलो आहे. कोरोनाची चाचणी आणि त्यानंतर दिल्या जाणाऱ्या सुविधांचा एक अनुभव मिळाला आहे, जो जीवनाचा एक अंग बून शकणार नाही.’ हे तिचे म्हणणे अनेकजणांना पटले नाही. त्यामुळे ‘तुझी गाडी, तुझे घर आणि व्यवसाय जरी गोव्यात नोंदीत असला तरी तू मूळची गोव्यातील नाहीस’, असे नेटकऱ्यांनी तिला फटकारले आहे. ‘गोवा सरकारने खरेतर या लोकांना राज्यात येण्यास परवानगीच देऊ नये.’ असेही ट्रोल केले गेले आहे.
गेल्या तीन दिवसांपासून गोव्यात परदेशातून, परराज्यातून लोक येऊ लागल्याने कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. रुग्ण वाढण्यापूर्वी जी स्थिती होती, त्या काळात पूजा बेदी गोव्यात आली आहे. तिच्या ट्विटवर इतर अनेकांनीही प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहेत. गेल्या काही महिन्यांत ती मानेक या तिच्या होणाऱ्या नवऱ्याबाबत सतत चर्चेत राहिली आहे.

संबंधित बातम्या