साई पल्लवीच्या लिंचिंगच्या वक्तव्यावरून निर्माण झाला वाद, साऊथचे सुपरस्टार्स आले समर्थनार्थ

नुकतेच मला एका मुलाखतीत मी उजव्या विचारांची आहे की डाव्या विचारांची आहे, असा प्रश्न मला विचारण्यात आला होता. त्यावेळी मी तटस्थ आहे, असं मी स्पष्टपणे सांगितलं होतं.
Sai Pallavi
Sai PallaviTwitter

सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवीने काही दिवसांपुर्वी काश्मिरी पंडितांबद्दल आणि लिंचिंगबद्दल विधान केले होते, ज्यावरून वाद निर्माण झाला होता. तसे, साईने तिच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे. आता याच दरम्यान साऊथ आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध सुपरस्टार प्रकाश राज यांनी साई पल्लवीला पाठिंबा दिला आहे. प्रकाश राज यांनी सई पल्लवीच्या स्पष्टीकरणाचा व्हिडिओ रिट्विट केला आहे. ज्यामध्ये त्यांनी अभिनेत्रीचे समर्थन केले आहे. प्रकाश यांनी ट्विट करताना लिहिले की, 'माणुसकी प्रथम आहे... आम्ही साई पल्लवी सोबत आहोत'. (Prakash Raj Support Sai Pallavi)

साईने केले होते हे वक्तव्य

एका मीडिया मुलाखतीदरम्यान सई पल्लवी म्हणाली होती की, ''द काश्मीर फाइल्स' या चित्रपटात काश्मिरी पंडितांचे हत्याकांड दाखवण्यात आले आहे. दुसरीकडे, हिंसाचार आणि धर्म या तराजूत तोलला गेला, तर काही कोरोना काळात गायींनी भरलेला ट्रक घेऊन जाणाऱ्या एका मुस्लिम व्यक्तीला बेदम मारहाण करून जय श्री राम म्हणण्यास सांगितले होते. आता या दोन घटनांमध्ये काय फरक आहे ते सांगा.' पल्लवीच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली.

Sai Pallavi
कंगना रणौतचा, 'अग्निपथ' योजनेला पाठिंबा, 'अग्निपथ म्हणजे...'

अभिनेत्रीने दिले स्पष्टीकरण...

तिच्या विधानावर स्पष्टीकरण देताना, सईने एक व्हिडिओ जारी केला आहे ज्यामध्ये ती म्हणाली, "आज पहिल्यांदाच मी एखाद्या विषयावर स्पष्टीकरण देण्यासाठी तुमच्याशी बोलत आहे. माझ्या वक्तव्याचा पुन्हा विपर्यास करण्यात येऊ नये, म्हणून आज पहिल्यांदाच मी दोनवेळा विचार करून माझं म्हणणं मांडत आहे. त्यामुळे माझं म्हणणं लांबलचक वाटत असल्यास मला माफ करावं. कोणतेही विचार स्वीकारण्याआधी आपण एक चांगला माणूस असणं गरजेचं आहे, असं मी त्यावेळी म्हणाले होते. पुढे मुलाखतीत सविस्तर बोलत असताना मी दोन संदर्भ दिले. या दोन गोष्टींचा माझ्या मनावर खोल परिणाम झाला होता."

"खरं तर, काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिल्यानंतर मला चित्रपटाच्या दिग्दर्शकांशी बोलण्याची संधी मिळाली. तीन महिन्यांपूर्वी हा चित्रपट पाहत असताना त्यांची ती दशा पाहून पाहून मी विचलित झाले होते. या नरसंहाराच्या घटनेचा परिणाम त्यांच्या पुढच्या पीढ्यांवर झाला आहे, त्यांच्या वेदनांची मला कल्पना आहे. तसंच त्यावेळी मी कोव्हिड काळात झालेल्या मॉब लिंचिंगच्या घटनांचाही उल्लेख केला होता. ते व्हीडिओ पाहून मला धक्का बसला होता. हिंसा कोणत्याही स्वरुपात असो, ती चुकीची आहे, असं मला वाटतं. कोणत्याही धर्माच्या नावे होणारी हिंसा ही चुकीचीच आहे, इतकंच मला म्हणायचं होतं. मला वाटतं, कुणाचाही जीव घेण्याचा अधिकार आपल्या कुणालाच नाही. मी वैद्यकीय पदवीधर असल्याने सगळे जीव समान आहेत, सगळेच जीव महत्त्वाचे आहेत, हे मला चांगलंच माहिती आहे. असा दिवस येऊ नये की एखादा जीव जन्माला आला, पण त्याला त्याच्या ओळखीबाबत भीती वाटावी, अशी मी प्रार्थना करते, असे स्पष्टिकरण साईने दिले.

Sai Pallavi
'जर काश्मिरी पंडितांचे निर्गमन हा धार्मिक संघर्ष असेल तर...' साई पल्लवीचं मोठ वक्तव्य

"14 वर्षांच्या माझ्या शालेय जीवनात मी सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझं माझ्या देशावर प्रेम आहे, ही प्रतिज्ञा मी रोज म्हणायचे. ही प्रतिज्ञा अजूनही माझ्या मनात खोलवर घर करून आहे. आपण शाळकरी मुलं असताना कोणत्याही प्रकारचा सांस्कृतिक किंवा जातीय भेदभाव करायचो नाही. म्हणून मी काहीही बोलत असताना अतिशय तटस्थपणे बोलत असते. पण माझ्या वक्तव्याचा विपर्यास होत असल्याचं पाहून मला धक्का बसला. अनेक प्रतिष्ठित व्यक्ती, वेबसाईट यांनी पूर्ण मुलाखत न पाहता माझ्या बोलण्याचा विशिष्ट संपादित भाग काढून त्यावर टीका केली. यामुळे माझ्या वक्तव्याचा मूळ अर्थ निघून गेला. यादरम्यान, काही लोक माझ्यासोबत ठामपणे उभे होते. त्यांचे मी आभार मानते. मी काय चुकीचं केलं असा विचार मी करत असताना ते लोकं माझ्यासोबत असल्याचं पाहून मला बरं वाटलं. मी नेमकी काय आहे, हे त्यांना माहिती आहे, हे पाहून मला अभिमान वाटला. धन्यवाद. सर्वांना प्रेम."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com