'प्रेम ग्रंथ'ची सिल्व्हर ज्युबिली; बलात्कारासारख्या संवेदनशील मुद्याला वाचा फोडणारा चित्रपट

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 26 मे 2021

बॉलिवूडची(Bollywood) 'धक-धक गर्ल' माधुरी दीक्षितने(Madhuri Dixit) सोशल मीडियावर(Social Media) 'प्रेमग्रंथ'(prem granth) चित्रपटाच्या सेटवरील हे फोटो आहेत. चित्रपटाला रिलीज होऊन 25 वर्षे पूर्ण झाली असून या खास प्रसंगी अभिनेत्री माधूरी दिक्षीतने हे फोटो शेअर केले आहेत.

बॉलिवूडची(Bollywood) 'धक-धक गर्ल' माधुरी दीक्षित(Madhuri Dixit) सोशल मीडियावर(Social Media) बरीच अ‍ॅक्टिव्ह असते  दिवसभर काही ना काही शेअर करत असते. पण अलीकडे तीने काही खूप जुने फोटो शेअर केले आहेत, वास्तविक, ही फोटो 'प्रेमग्रंथ'(prem granth) चित्रपटाच्या सेटवरील हे फोटो आहेत. चित्रपटाला रिलीज होऊन 25 वर्षे पूर्ण झाली असून या खास प्रसंगी अभिनेत्री माधूरी दिक्षीतने हे फोटो शेअर केले आहेत.

1996 मध्ये रिलीज झालेल्या माधुरी दीक्षित आणि ऋषी कपूर स्टारर प्रेम ग्रंथच्या रिलीजला 2021 मध्ये 25 वर्षे पूर्ण केली आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिवंगत दिग्दर्शक आणि अभिनेता राजीव कपूर यांनी केले होते. या चित्रपटात दिवंगत अभिनेता ऋषी कपूर आणि अभिनेत्री माधुरी दीक्षित यांनी मुख्य भूमिका साकारल्या आहेत. तेव्हा ‘प्रेमग्रंथ’ चित्रपटाला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल माधुरी दीक्षितने शेअर केलेले फोटो बघूया.

'प्रेमग्रंथ' हा चित्रपट बलात्कार सारख्या गंभीर विषयावर तयार करण्यात आला होता, जो त्या काळातील अगदी  संवेदनशील चित्रपट होता. कदाचित याच कारणामुळे त्यावेळी त्या चित्रपटाला प्रेक्षकांनी काही खास पसंत केले नाही मात्र,या चित्रपटाची गाणी चांगलीच गाजली आणि लोकांनी त्याला चांगलिच पसंती दर्शवीली. 'दिल देने की रुत आयी' हे गाणे आजही लोकांच्या जिभेवर कायम आहे.

बॉलिवूडच्या चॉकलेट बॉयसोबत सामंथाला करायचाय रोमांन्स 

या चित्रपटाचे चित्रीकरण केवळ भारतातच नाही तर परदेशातही झाले आहे. या चित्रपटाचे हिट गाणे दिल देणे रूत आयी' चे चित्रीकरण दक्षिण आफ्रिकेत झाले होते. अभिनेत्रीने एक फोटो शेअर केला आहे, ज्यात चित्रपटाचे संपूर्ण टीम आणि तांत्रिक कर्मचारीदेखील दिसत आहेत. या फोटोत राजीव कपूर, माधुरी दीक्षित, सरोज खान यांच्या व्यतिरिक्त उर्वरित संघही दिसत आहेत. तर दुसर्‍या फोटोमध्ये माधुरी दीक्षित खुर्चीवर बसलेली दिसत असून अभिनेता रणधीर कपूर तिच्यासोबत बसलेले दिसत आहेत. हे फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'एक चांगला चित्रपट जो आजच्या काळावर आधारित आहे. 

अक्षय कुमारने लावला सूर्यवंशी आणि बेल बॉटम च्या अफवांवर पूर्णविराम 

'प्रेम ग्रंथ' चित्रपटात जातीभेद, गैरवर्तन यासारखे संवेदनशील विषय मांडले गेले होते. यावरून असे दिसून येते की, सोमेन हा उच्च जातीचा मुलगा खालच्या जातीच्या कजरीच्या प्रेमात पडला आहे. जी दिसायला एक सुंदर मुलगी आहे. यानंतर, एके दिवशी कजरी अचानक गाव सोडून निघून जाते. आणि येथूनच चित्रपटाची खरी कहाणी सुरू होते. जर आपण चित्रपट पाहिला नसेल आणि तो पहायचा असेल तर तो ओटीटी प्लॅटफॉर्म जी 5 वर उपलब्ध आहे.
 

संबंधित बातम्या