विकी-कैटच्या लग्नाची तयारी जोरदार चालु!

लग्नाच्या तयारीसाठी राजस्थान मध्ये पोहोचली विकी-कैटची टीम.
विकी-कैटच्या लग्नाची तयारी जोरदार चालु!
MarriedDainik Gomantak

काहीच दिवसात बॉलीवूड मधील आवडत्या कपलच्या लिस्ट मध्ये सामील होणारे विकी कौशल (Vicky Kaushal) आणि कतरिना कैफ (Katrina Kaif) यांच्या लग्नाची तयारी जोरात सुरू आहे. अलीकडेच दोघांनी लग्नाची (Married) सर्व व्यवस्था करण्यासाठी आपली टीम राजस्थानला पाठवली आहे.

बॉलीवूड (Bollywood) कलाकार कतरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाच्या अफवा अनेक महिन्यांपासून सोशलमीडिया वरती पसरत होत्या, आता त्या अफवांना हळूहळू मोहर लागत आहे. मुहुर्ता प्रमाणे त्यांचे लग्न मे महिन्यामध्ये होणार असल्याचे समोर आले होते, पण बिझी शेड्यूलमुळे विकी आणि कतरिना या वर्षाच्या अखेर पर्यंत लग्न करणार असल्याचे दिसुन येते आहे. विकी-कैटचे लग्न भारतातील (India) सर्वांत सुंदर ठिकाणी म्हणजेच 'राजस्थान' (Rajasthan) मध्ये होणार आहे. एकमेकांना गुपचूप एंगेज केल्यानंतर आता ते लग्नाच्या तयारीत असल्याचे दिसुन येत आहे. त्यांनी लग्नासाठी राजस्थान मधील सिक्स सेन्स फोर्ट हॉटेल निवडले असल्याचे सांगितले जात आहे.

Married
ऋषि कपूर यांना आवडले नव्हते रणबीच्या 'रॉकस्टार' चित्रपटातील गाणे

विकी आणि कतरिनाची 10 सदस्यीय टीम मंगळवारी राजस्थानमधील सवाई माधोपूर (Sawai Madhopur) जिल्ह्यातील (Districts) सिक्स सेन्स फोर्ट हॉटेलमध्ये (Six Senses Fort Barwara) लग्नासाठीची हॉटेलमधील व्यवस्था पाहण्यासाठी पोहोचली आहे. विकीच्या एट्री पासुन ते, मेहेंदी कार्यक्रमाच्या सर्व व्यवस्थेवर टीम निर्णय घेणार आहे. हॉटेल्स 7 ते 12 डिसेंबर पर्यत बुक केले आहे, आणि लग्नामधील अनेक कार्यक्रम वेगवेगळ्या कंपन्यांना देण्यात आले आहे. त्याबाबत टीम तयार करण्यास सांगितले आहे.

विकी आणि कतरिनाने अद्याप लग्नाबाबतचे मौन सोडलेले नाही. मीडियासमोर (Media) आल्यानंतर ते लग्नाचे प्रश्न टाळत आहेत, विकीच्या एका मित्राने सांगितले की, दोघेही सध्या कोणाचाही फोन उचलत नाहीत. कतरिनाच्या एका जवळच्या सहाय्यकाने सांगितले की, मीडियामध्ये लग्नाच्या अफवांमुळे कतरिना खूप नाराज आहे, त्यामुळे दोघेही मीडियापासून अंतर राखताना दिसत आहेत. अलीकडेच विकी आणि सारा अली खान यांना एकत्र स्पॉट केले होते, तिथे एका रिपोर्टरने विकीला लग्नाबद्दल विचारले, त्यावर सारा अली खान हसली पण विकीने ऐकूनही प्रश्नाकडे दुर्लक्ष केले.

कामांबद्दल बोलायचे झाले तर, कतरिनाचा अलीकडेच अक्षय कुमारसोबतचा (Akshay Kumar) सुपरहिट सूर्यवंशी (Sooryavanshi) चित्रपट खुप गाजला आहे. दुसरीकडे, विकी कौशल सरदार उधममध्ये दिसुन आला होता. विकीला या चित्रपटातील त्याच्या अभिनयामुळे खूप प्रशंसा मिळाली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com