Prime Video New Series: प्राईम व्हिडीओची आगामी सिरीज 'सिनेमा मरते दम तक'ची स्पेशल स्क्रिनींग

प्राईम व्हिडीओची आगामी सिरीज ' सिनेमा मरते दम तक'च्या स्पेशल स्क्रिनींगला अनेक सेलीब्रिटींनी हजेरी लावली होती.
Prime Video
Prime VideoDainik Gomantak

Prime Video New Series अमेझॉन ओरिजनल रिअ‍ॅलिटी डॉक्यू-सिरीज 'सिनेमा मरते दम तक' प्रेक्षकांना पडद्यामागील 90 च्या दशकातील हिंदी पल्प मूव्हीजच्या जगात घेऊन जायला सज्ज आहे. एक गोल्डन-एरा या चित्रपटांतून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.

अलीकडेच, प्राइम व्हिडीओ, वसन बाला आणि व्हाइस मीडियाने इंडस्ट्रीतल्या आपल्या मित्रांना आणि मीडिया सदस्यांना एकत्र आणून लव्ह फॉर सिनेमा साजरा करण्यासाठी या रिअ‍ॅलिटी डॉक्यू-सिरीजच्या विशेष स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आलं होतं.

यादरम्यान, सिनेमा मरते दम तक'ची टीम मोठ्या उत्साहात दिसली आणि प्रेक्षकांचे कौतुक, टाळ्या आणि प्रेम पाहून भारावून गेली. या स्पेशल स्क्रिनिंगमध्ये प्राइम व्हिडीओच्या हेड ऑफ इंडिया ओरिजनल्स, अपर्णा पुरोहित, वसन बाला, आणि समीरा कंवरसह विनोद तलवार, शिवा रिंदानी आणि हरीश पटेल यांसारखे 90 च्या दशकातील इंडस्ट्रीतील क्रिएटर्स उपस्थित होते.

या स्पेशल स्क्रिनिंगला सिकंदर खेर, हुमा कुरेशी, आकांशा रंजन कपूर, राधिका मदान, आरती कदव, कनन गिल, सुमुखी सुरेश, साहिल शाह, कनीज सुरका, सुमैरा शेख, आणि रिताशा राठोड हे कलाकारही या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

व्हाइस स्टुडिओज प्रॉडक्शनची निर्मिती असलेला ही सिरीज उत्कृष्ट फिल्ममेकर वसन बालाद्वारा निर्मित, या सिरीजचे 6 भाग असतील. या रिअ‍ॅलिटी डॉक्यूमेंट्री-सिरीजमध्ये पहिल्यांदा 90 च्या दशकातील पल्प सिनेमा इंडस्ट्रीतील ग्लिझ आणि इंडिपेंडेंट इकोसिस्टमची झलक दाखवण्यात आली आहे.

दिशा रिंदानी, झुल्फी आणि कुलिश कांत ठाकूर यांनी सह-दिग्दर्शित केलेली 'सिनेमा मरते दम तक'ही सिरीज 90 च्या दशकातील चार विलक्षण दिग्दर्शक - जे नीलम, विनोद तलवार, दिलीप गुलाटी आणि किशन शाह यांच्यासोबत प्रेक्षकांना पडद्यामागे घेऊन जाते.

Prime Video
Anurag Kashyap on PM Modi: "आता गोष्टी हाताबाहेर गेल्या आहेत !" PM मोदींना उद्देशुन अनुराग कश्यप हे काय म्हणाला?

, 'सिनेमा मरते दम तक या सिरीजमध्ये रझा मुराद, मुकेश ऋषी, हरीश पटेल आणि राखी सावंत या कलाकारांना पाहायला मिळणार असून, ते भारतीय सिनेमाच्या अशा पैलूंवर आपले विचार व्यक्त करतील ज्याबद्दल प्रेक्षकांना विशेष माहित नाही.

या सिरीजमध्ये अभिनेता अर्जुन कपूरला देखील शेवटच्या एपिसोडमध्ये होस्ट म्हणून पाहायला मिळेल. 'मरते दम तक'ही सिरीज 20 जानेवारी रोजी भारत तसेच जगभरातील 240 देश आणि प्रदेशांमध्ये प्राइम व्हिडिओवर प्रीमियर होण्यासाठी सज्ज आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com