Hari Har Song: 'पृथ्वीराज' सम्राटाची गाथा सांगणार पहिलं गाणं 'हरी हर' रिलीज

Prithviraj first Song Hari Har Song: 'पृथ्वीराज' या चित्रपटाचे पहिल गाणं रिलीज झाले आहे.
 Prithviraj | Hari Har Song|
Prithviraj | Hari Har Song|Dainik Gomantak

सम्राट पृथ्वीराज चौहान यांच्या गौरवावर आधारित 'पृथ्वीराज' चित्रपटातील पहिले गाण 'हरी हर' रिलीज झाले आहे. सम्राटाची गाथा या गाण्यात दाखवण्यात आली आहे. हे गाण अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे.

अक्षय कुमारने 'पृथ्वीराज' या चित्रपटाचे पहिल गाण सोशल मिडियावर शेअर केले आहे. अक्षयने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे. अक्षयच्या या पोस्टवर त्यांच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कॅमेन्टचा वर्षाव केला आहे.

 Prithviraj | Hari Har Song|
दीपिका पदुकोण बनली लुई व्हिटॉनची पहिली भारतीय अ‍ॅम्बेसिडर

हे गाणे आदर्श शिंदे यांनी गायले आहे तर संगीत शंकर एहसान लॉय यांचे आहे. या गाण्याचे बोल वरुण ग्रोव्हरचे आहेत. आदर्श शिंदे व्यतिरिक्त अनेक गायकांनी या गाण्याला आवाज दिला आहे. यशराज फिल्म्सचा पहिला ऐतिहासिक चित्रपट (Movie) 'पृथ्वीराज' 3 जून 2022 रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगूमध्ये रिलीज होणार आहे. 'पृथ्वीराज' हा चित्रपट 'पृथ्वीराज रासो' या पुस्तकावर आधारित आहे, ज्यात राजपूत राजा 'पृथ्वीराज चौहान' यांचे जीवन आणि शौर्याचे जतन करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com