प्रियंका चोप्राने 'सिटाडेल' ची शूटिंग पुर्ण होताच शेअर केला सुंदर व्हिडीओ

Priyanka Chopra: प्रियंका चोप्राने तिच्या आगामी 'सिटाडेल' वेबसीरिजची शूटिंग पूर्ण केली आहे.
प्रियंका चोप्राने 'सिटाडेल' ची शूटिंग पुर्ण होताच  शेअर केला सुंदर व्हिडीओ
Priyanka ChopraInstagram

बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) तिच्या पहिल्या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. तिने अलिकडेच 'सिटाडेल'ची (Citadel) शूटिंग पूर्ण केली आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेत या वेबसीरिजची शूटिंग सुरू होती. प्रियंकाने व्हिडीओ शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. प्रियंकाची ही वेब सीरिज अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर (Amazon Prime Video) रिलीज होणार आहे. (priyanka chopra completes shooting citadel desi girl shared video news)

प्रियंका चोप्रा सोशल मीडियावर (Social Media) नेहमीच अॅक्टिव्ह असते. त्यामुळेच 'सिटाडेल'ची शूटिंग पूर्ण झाल्याची माहिती प्रियंकाने इंस्टावर व्हिडीओ शेअर करत चाहत्यांना सांगितले आहे. या व्हिडीओमध्ये प्रियंकाने शूटिंगच्या पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंतच्या अनेक आठवणी चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत.

'सिटाडेल' (Citadel) या वेबसीरिजमध्ये प्रियंका चोप्रा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या वेबसीरिजमध्ये प्रियंकासोबत रिचर्ड मॅडनदेखील दिसून येणार आहे. रिचर्ड मॅडन 'गेम्स ऑफ थ्रोंस'मध्ये दिसून आला होता. त्यामुळे प्रेक्षक आता 'सिटाडेल' या वेबसीरिजची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Priyanka Chopra
Erica Fernandes चा हटके अंदाज पाहिलात का?

प्रियंका चोप्राचे आगामी चित्रपट

प्रियंका चोप्राचे (Priyanka Chopra) अनेक हॉलिवूड चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. तसेच प्रियंका फरहान अख्तरसोबत 'जी ले जरा' या चित्रपटामध्ये (Movie) दिसणार आहे. या चित्रपटामध्ये प्रियंकासोबत आलिया भट्ट आणि कतरिना कैफदेखील दिसणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com