Priyanka Chopra: प्रियंका चोप्राने 'फादर्स डे' निमित्त शेअर केली खास पोस्ट

Priyanka Chopra Post: फादर्स डेच्या निमित्ताने प्रियंका चोप्राने एक खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये निक आणि मालती एकत्र दिसत आहेत
Priyanka Chopra
Priyanka ChopraDainik Gomantak

जागतिक आयकॉन प्रियांका चोप्रा आणि निक जोनससाठी 'फादर्स डे' (Father's Day) खूप खास आहे. या वर्षी दोघेही पालक झाले आणि मुलगी मालतीसोबत त्यांचा हा पहिलाच फादर्स डे आहे. प्रियांकाची मुलगी रुग्णालयातून घरी परतल्यापासून प्रियांका खूप आनंदात आहे. मालती जन्मानंतर 100 दिवसांपर्यंत हॉस्पिटलमध्ये होती, त्यामुळे निक आणि प्रियांका खूप नाराज होते. आता मालती घरी आल्याने त्या दोघांसाठी सर्व काही सुंदर झाले आहे. फादर्स डेच्या निमित्ताने प्रियांकाने मालती आणि निकला खास भेट दिली आहे. ज्याचा फोटो तिने सोशल मिडीयावर शेअर केला आहे. (priyanka chopra gifts matching shoes nick jonas malti marie on fathers day shares cute photo news)

प्रियांकाने निक (Nick Jonas) आणि मालतीचा एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये दोघांचे चेहरे दिसत नाहीत. फोटोमध्ये (Photo) निक मालतीला हाताने धरून उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे. या क्युट फोटोवरून चाहत्यांची नजर हटत नाहीये. फोटोमध्ये मालती लाल फुलांचा ड्रेस घातला आहे.

Priyanka Chopra
गोविंदाला जायचे होते रेखासोबत डेटवर!

प्रियांकाने निक आणि मालतीला मॅचिंग शूज गिफ्ट केले आहेत. मालतीच्या शूजवर M लिहिलेले आहे, तर निकच्या एका बुटावर MM आणि दुसऱ्यावर DAD लिहिलेले आहे. चाहत्यांच्या नजरा मालतीच्या क्यूट शूजवर खिळल्या आहेत. पोस्ट शेअर करत प्रियांकाने लिहिले- 'हॅपी फादर्स डे माय लव्ह. तुम्हाला आमच्या लहान मुलीसोबत पाहून खूप आनंद झाला. घरी परतण्यासाठी किती छान दिवस. मी तुझ्यावर प्रेम करते. येणारे दिवस असेच जावोत'.

निकने पोस्ट शेअर केली
निकनेही तोच फोटो शेअर केला आणि लिहिले - 'माझ्या लहान मुलीसोबत पहिला फादर्स डे. प्रियंकाचे आभार देखिल मानले आहे. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. सर्व वडिलांना आणि काळजीवाहूंना फादर्स डेच्या शुभेच्छा.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com