प्रियांका चोप्राने प्रथमच शेअर केला लेकीचा फोटो

Priyanka Chopra Daughter: मदर्स डेच्या निमित्ताने प्रियंका चोप्राने तिच्या चिमुकलीचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे.
प्रियांका चोप्राने प्रथमच शेअर केला लेकीचा फोटो
Priyanka chopraInstagram

बॉलिवूड ते हॉलिवूड असा आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा नुकतीच आई बनली आहे. तिने सोशल मीडियावर ही माहिती दिली होती. तेव्हापासून प्रियांकाच्या मुलीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत होते. चाहत्यांची प्रतीक्षा आता संपली आहे, कारण प्रियांकाने तिच्या मुलीचा फोटो शेअर केला आहे. (Priyanka Chopra Daughter News)

मदर्स डेच्या निमित्ताने प्रियंका चोप्राने इन्स्टाग्रामवर तिच्या चिमुकलीचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिच्या मुलीचा चेहरा दिसत नसला तरी चाहत्यांसाठी मुलीची फक्त एक झलक पुरेशी आहे. प्रियांका चोप्राने शेअर केलेल्या फोटोमध्ये पती निक जोनासही दिसत आहे. प्रियांकाने बाळाला स्वत: जवळ अगदी प्रेमाने कवटाळलं आहे तर निक त्याच्या लेकीकडे प्रेमाने पाहत आहे.

हा फोटो शेअर करताना प्रियांकाने आई झाल्याची भावना चाहत्यांसोबत शेअर केली आहे. तिने लिहिलं, "मदर्स डेच्या निमित्ताने मी तुम्हाला सांगू इच्छिते की, गेले काही दिवस आमच्यासाठी रोलर कोस्टर राईडसारखरे होते. आम्हाला माहित आहे की अनेकांनी याचा अनुभव घेतला असेल. NICU मध्ये 100 हून अधिक दिवसांनंतर, आमचं बाळ अखेर घरी आलं आहे. प्रत्येक कुटुंबाचा प्रवास अनोखा असतो आणि त्यासाठी एका विशिष्ट स्तरावरील विश्वासाची आवश्यकता असते आणि आमच्या आयुष्यातील मागील काही महिने आव्हानात्मक होते. मागे वळून पाहिलं तर प्रत्येक क्षण किती मौल्यवान आणि परिपूर्ण आहे याची जाणीव होते. आमची चिमुकली घरी आल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे. आम्ही लॉस एंजेलिसमधील रेडी चिल्ड्रन्स ला जोला अँड सेडर्स सिनाई मधील प्रत्येक डॉक्टर, नर्स आणि तज्ज्ञांचे आभार मानतो, ज्यांनी निस्वार्थपणे काम केले. आमचा पुढचा प्रवास आता सुरु होत आहे आणि आमचं बाळ खरोखरच लढाऊआहे. चला एमएम पुढे जाऊया. आई आणि बाबांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे."


प्रियांकाने मुलीचं नाव 'मालती मेरी चोप्रा जोनास' असे ठेवले आहे. या पोस्टमध्ये प्रियांका चोप्राने आपल्या मुलीला 'एमएम' म्हटलं आहे, ज्याचा अर्थ 'मालती मेरी' असा असू शकतो. यासोबतच प्रियांका हिंदू आणि निक ख्रिश्चन असून या मुलीच्या नावात हे दोन्ही झळकतं. शिवाय तिने मुलीच्या नावात दोघांचीही आडनावं लावली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com