प्रियंका चोप्राने आईच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेला खास फोटो पाहिलात का ?

बॉलिवूड आणि हॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासोबतच तिने मालती मेरीचीही झलक दाखवली आहे.
प्रियंका चोप्राने आईच्या वाढदिवसानिमित्त शेअर केलेला खास फोटो पाहिलात का ?
Priyanka ChopraInstgaram

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा नेहमीच सोशल मिडीयावर चर्चेत असते. ती सोशल मिडीयावर नेहमी फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. प्रियांका चोप्रा सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. यावेळी तिचे लेटेस्ट फोटो चर्चेत आला आहे. या पोटोद्वारे, प्रियंका चोप्राने तिची आई मधु चोप्राला तिच्या वाढदिवसाच्या खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या हातांनी प्रियांकाने पुन्हा एकदा तिची मुलगी मालती मेरीची झलक दाखवली आहे. फोटोमध्ये दिसणार्‍या तीन पिढ्या पाहून चाहत्यांना खप आनंद झाला आहे. (priyanka chopra shares her daughter malti maries adorable photo her mother madhu chopdas birthday)

प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) तिच्या आईच्या वाढदिवशी तिच्यावर खूप प्रेमाचा वर्षाव करत आहे. फोटोमध्ये मधु चोप्रा आपली नात मालती हिला आपल्या मांडीत धरताना दिसत आहे. नातीसोबतचा मधु चोप्राचा हा सुंदर फोटो शेअर करत प्रियंका चोप्राने लिहिले की, 'वाढदिवसाच्या शुभेच्छा आई... नेहमी असेच सकारात्मक हसत राहा. तुम्ही मला दररोज तुमच्या अनुभवांनी खूप प्रेरित करता. तुमचा सोलो युरोप ट्रिप वाढदिवसाचा उत्सव सर्वोत्कृष्ट होता.' या फोटोवर कमेंट करताना मधु चोप्राने प्रियांका चोप्राचे आभार मानले आहेत. ती लिहिते, 'धन्यवाद... हा माझा सर्वात खास वाढदिवस आहे.'

Priyanka Chopra
सिद्धार्थ मल्होत्रासोबतच्या ब्रेकअपवर बोलताना कियारा अडवाणी म्हणाली....

* मुलीचा चेहरा दाखवला नाही
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास (Nick Jonas) या वर्षी सरोगसीद्वारे पालक बनले आहेत.आई झाल्यापासून प्रियंका चोप्राने तिची मुलगी मालती मेरीचे अनेक फोटो शेअर केले आहेत. पण मालती मेरीचा चेहरा आतापर्यंत कोणत्याही फोटोमध्ये दिसला नाही. तरी सुध्दा प्रियंका चोप्राच्या मुलीला पाहण्याची लोकांमध्ये इतकी क्रेझ आहे की तिचा प्रत्येक फोटो काही मिनिटांत व्हायरल होतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com