Priyanka Chopra ने शेअर केला मालती मेरीचा नवीन फोटो

Priyanka Chopra Daughter Photo: या नव्या फोटोमध्ये मालती कारमध्ये गोंडस स्टाईलमध्ये बसलेली दिसली.
Priyanka Chopra
Priyanka ChopraDainik Gomantak

बॉलिवूडमधील प्रसिध्द अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. अलीकडेच तिने निक जोनासचा 30 वा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा केला. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून सेलिब्रेशनची झलकही चाहत्यांसह शेअर केली आहे. तिची मुलगी मालतीचा एक नवीन फोटो देखील शेअर केला आहे. यामध्ये नेहमीप्रमाणे चेहरा दिसत नसला तरी या फोटोमध्ये मालतीचे छोटे हात पाय नक्कीच दिसत आहेत.

फोटोमध्ये प्रियांकाची मुलगी कारमध्ये स्ट्रोलरमध्ये बसलेली दिसत आहे. प्रवासा दरम्यान क्लिक केलेले फोटो दिसत आहे. मालतीचे छोटे पाय दिसत आहेत. तिने गुलाबी शूज घातले आहेत. प्रियांकाने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये हा फोटो शेअर केला आहे. ज्यावर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत. 

Priyanka Chopra
'महाभारत 2.0' होणार बॉलिवूडचा सर्वात महागडा चित्रपट, वाचा सविस्तर एका क्लिकवर
Priyanka Chopra
Priyanka ChopraDainik Gomantak

मुलीचा फोटो शेअर करत प्रियांकाने लिहिले की, "आम्ही इथे मोठे आलो आहोत." ती आणि निक या वर्षीच सरोगसीद्वारे पालक बनले आहेत. जानेवारीमध्ये दोघांनी ही गोड बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती.

* मालतीचा चेहरा पाहण्यासाठी चाहते आतुर

प्रियंका अनेकदा तिच्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. पण तिचा चेहरा कधीच दाखवत नाही. विराट कोहली आणि अनुष्का शर्माप्रमाणेच प्रियांका आणि निक यांनीही मालतीचा चेहरा अद्याप न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे. मालतीची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. आता ही प्रतीक्षा कधी संपते ते बघू.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com