प्रियंका चोप्राने दिल्या लाडक्या बहिणीला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 22 ऑक्टोबर 2020

परिणीती चोप्रावर तिच्या वाढदिवसानिमित्त तिचे चाहते सकाळपासूनच शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. भूमी पेडणेकर, सिद्धार्थ मल्होत्रा, आयुष्मान खुराना, अथिया शेट्टी यांच्यासह बी-टाउन सेलिब्रिटींनीदेखील तिला शुभेच्छा दिल्या.

मुंबई-  प्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिची चुलत बहीण आणि अभिनेत्री परिणीती चोप्राला तिच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. आपल्या सोशल मिडियावरून हँडलवरून तिने शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रियांकाने परिणीतीला शुभेच्छा देण्यासाठी तिच्या लग्नातील परिणीतीसोबतचा फोटो पोस्ट केला आहे.

परिणीती चोप्रावर तिच्या वाढदिवसानिमित्त तिचे चाहते सकाळपासूनच  शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. भूमी पेडणेकर, सिद्धार्थ मल्होत्रा, आयुष्मान खुराना, अथिया शेट्टी यांच्यासह बी-टाउन सेलिब्रिटींनीदेखील तिला शुभेच्छा दिल्या.

प्रियांका सध्या तिच्या 'अनफिनिश्ड' या जीवनचरित्रासाठी काम करत आहे. काही दिवसांपूर्वी तिने याच्या मुखपृष्ठाचे अनावरण केले आहे. या पोस्टचे शीर्षक, हे ''मी हे लिखाण सुरू करण्यापूर्वी अनेक वर्षांपूर्वी याचे नाव ठेवले आहे. आता २० वर्षे सार्वजनिक जीवन जगणारे, आयुष्य जगण्याची आणि वैयक्तिक व व्यावसायिकदृष्ट्या माझी  लांबलचक यादी असूनही, खूप गोष्टी अपूर्ण आहेत. परंतु एक संस्मरण लिहिण्याची मजेदार गोष्ट अशी साहे की, हे लिखाण आपल्याला असंख्य अपूर्ण गोष्टींचा समेट करून त्या गोष्टींकडे वेगळ्या प्रकारे पाहण्यास भाग पाडतात. असे केल्याने मला जाणवले की “अपूर्ण” राहणे याचा माझ्यासाठी सखोल अर्थ आहे आणि खरं तर तो माझ्या आयुष्यातील सर्वात सामान्य धाग्यांपैकी एक आहे", असे होते.

दरम्यान, परिणीती चोप्रा सायना नेहवालच्या जीवनावर आधारित 'सायना' या चित्रपटात आणि ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ या ब्रिटिश चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे.

संबंधित बातम्या