Disha Patani Vs Ekta Kapoor: एकताने स्वतःच्या बायोपिकमधून दिशाला काढले बाहेर

बालाजी मोशन पिक्चर्सशी दिशाचा वाद; दिशा भुमिकेबाबत गंभीर नसल्याचा एकताचा दावा
Disha Patani Vs Ekta Kapoor
Disha Patani Vs Ekta KapoorDainik Gomantak

Disha Patani Vs Ekta Kapoor: निर्माती एकता कपुर हिने तिच्या आगामी चित्रपटातून अभिनेत्री दिशा पाटनी हिला बाहेरचा रस्ता दाखवला आहे. दिशाचे अनप्रोफेशनल वागणे याला कारणीभूत ठरल्याचा दावा केला जात आहे. आता दिशाला बाहेर काढल्याने या चित्रपटासाठी नव्या चेहऱ्याचा शोध घेतला जात आहे.

Disha Patani Vs Ekta Kapoor
Nepal Election : नेपाळ निवडणुकीत 'ही' अभिनेत्री उतरणार रिंगणात; हिंदुत्ववादी पक्षाचा करणार प्रचार

'केटीना' असे या चित्रपटाचे नाव असून हा चित्रपट खुद्द एकता कपुरवरच आधारीत असल्याचे सांगितले जात आहे. सुत्रांच्या माहितीनुसार तारा सुतारिया किंवा श्रद्धा कपूर यांच्यापैकी कुणीतरी दिशाची जागा घेऊ शकतात.

बालाजी मोशन पिक्चर्स आणि दिशामध्ये वाद

स्वतःच्या आयुष्यावर आधारीत असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः एकताच करत आहे. तिने या चित्रपटासाठी दिशाला घेतले होते. काही दृश्यांचे चित्रीकरणही झाले होते. पण आता मध्येच दिशाला या चित्रपटातून काढले गेले आहे. एकताची प्रोडक्शन कंपनी बालाजी मोशन पिक्चर्सचे काही सदस्य आणि दिशा पाटनी यांच्यात काही मुद्यांवरून वाद झाल्याचे समजते. आणि हा वाद मिटलेला नाही. त्यामुळे अखेर एकताने दिशाला काढण्यााचा निर्णय घेतला. त्याशिवाय कोणताही पर्याय तिच्याकडे नव्हता, असे सांगितले जात आहे.

Disha Patani Vs Ekta Kapoor
Sania Mirza-Shoeb Malik Divorce: 'या' मॉडेलमुळे सानिया-शोएबमध्ये आला दुरावा?

या चित्रपटात एकताने मोठी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे आता चित्रपटाचे काही सीन्स हे पुन्हा चित्रित केली जाणार आहे. दरम्यान, दिशा नुकतीच मोहित सुरी दिग्दर्शित 'एक व्हिलन रिटर्न' या चित्रपटात दिसली होती. टायगर श्रॉफसोबत रिलेशनशिपमध्ये असल्यावरून ती सतत चर्चेत असायची. तथापि, दोघांनी आता ब्रेकअप केले आहे.

दरम्यान, आगामी काळात दिशा 'योद्धा' या चित्रपटात दिसणार आहे. याचित्रपटात तिच्यासमवेत सिद्धार्थ मल्होत्रा आणि राशी खन्ना हे देखील मुख्य भुमिकेत असणार आहेत. दिशाने 'एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com