Shah Rukh Khan
Shah Rukh KhanDainik Gomantak

Pathan Controvery : 'पठाण'चं चित्रपटगृहावरचं पोस्टर फाडलं, पुण्यात बजरंग दल आक्रमक...

पठाण चित्रपटाचा वाद काही केल्या थांबायला तयार नाही.आता पुण्यात 'पठाण'चं पोस्टर फाडण्यात आलं आहे

अभिनेता शाहरुख खानचा पठाण गेल्या कित्येक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. चित्रपटातल्या बेशरम रंग या गाण्यावर खुप मोठा वाद निर्माण झाला. वाद इतका वाढला कि बिहारमध्ये शाहरुखसह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शेवटी सेन्सॉरने काही अटी घालुन चित्रपटाला परवानगी दिली आहे. चित्रपट 25 जानेवारीला रिलीज होतोय आणि आता चित्रपटाला पुन्हा विरोध सुरू झाला आहे.

पुणे येथे राहुल थिएटर वर लावलेलं पठाण चित्रपटाचं पोस्टर काढुन टाकण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार 'बजरंग दल' या हिंदुत्ववादी संघटनेने हे पोस्टर काढुन टाकले आहे. यावेळी पठाण चित्रपटाचा निषेध करत घोषणाही या संघटनेकडुन देण्यात आल्या.

Shah Rukh Khan
Kareena Kapoor: चित्रपट बॉयकॉट झाले तर मनोरंजन कसं होणार? करीना कपूर बॉयकॉट ट्रेंडवर थेटच बोलली.

पठाण चित्रपटाचा वाद गेले कित्येक काळापासुन सुरू आहे. सेन्सॉरने काही बदल सुचवुन या चित्रपटाला परवानगी दिली होती. पण तरीही चित्रपटाला असणारा विरोध कमी झाला नाही. या चित्रपटाच्या विरोधात देशभरात आंदोलन सुरू झालं. आता तर चित्रपटाला असणारा विरोध अजुनच तीव्र झाला आहे. पुण्यातील या घटनेवरून हा विरोध किती टोकाचा असेल हे लक्षात येतं

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com