HBD R.Madhvan : अभिनयाऐवजी या क्षेत्रात नाव कमवायचं होतं 'आर. माधवन'ला...मॅडी झाला 53 वर्षांचा

अभिनेता आर माधवनला अभिनयात करिअर करायचं नव्हतं चला पाहुया त्याच्या पहिल्या स्वप्नाविषयी त्याच्या 53 व्या वाढदिवसानिमित्त..
HBD R.Madhvan
HBD R.MadhvanDainik Gomantak

बॉलीवूडचा मॅडी अर्थात आर माधवन आपल्या एका अनोख्या अभिनय शैलीमुळे चाहत्यांचा लाडका आहे. आर माधवन हा बॉलिवूडसोबतचा साऊथचाही प्रसिद्ध स्टार आहे. या अभिनेत्याने इंडस्ट्रीला अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. 1 जून 1970 रोजी जमशेदपूरमध्ये जन्मलेला आर माधवन आज त्याचा 53 वा वाढदिवस साजरा करत आहेत. 

आर माधवनचे पूर्ण नाव रंगनाथ माधवन आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की इंडस्ट्रीत आपले अभिनय कौशल्य सिद्ध करणाऱ्या आर माधवनला अभिनयाऐवजी वेगळ्याच क्षेत्रात करिअर करायचं होतं ;पण नशीब बदललं आणि आर माधवन कसा सुपरस्टार बनला चला जाणून घेऊया. 

माधवनच्या कुटूंबाची पार्श्वभूमी अन् त्याचं स्वप्न...

आर माधवनचे वडील टाटा स्टील कंपनीत मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह होते. त्याचबरोबर त्याची आई सरोज बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर होत्या. आर माधवन लहानपणापासूनच अभ्यासात खूप हुशार होता आणि त्याला मोठा झाल्यावर आर्मी ऑफिसर बनायचे होते. आर माधवनने आर्मी, नेव्ही आणि एअर फोर्सचे प्रशिक्षणही घेतले. एवढेच नाही तर त्याला महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट कॅडेट पुरस्कारही मिळाला आहे. 

माधवनला नंतर शॉर्ट टर्म ट्रेनिंगसाठी इंग्लंडला जाण्याची संधी मिळाली ;पण नशिबाने त्याच्यासाठी काहीतरी वेगळाच बेत आखला होता. सैन्यात भरती होण्यासाठी तो सहा महिन्यांनी लहान होता त्यामुळे वयाच्या कारणामुळे त्याचं हे स्वप्न तेव्हा साकार होऊ शकलं नाही. हे घडल्यानंतर माधवनने आर्मी ऑफिसर होण्याचे स्वप्न सोडून दिले. 

माधवनने संवाद कौशल्याच्या शिकवण्याही घेतल्या

आर माधवनने शिक्षण पूर्ण केल्यानंतर पब्लिक स्पीकिंग आणि कम्युनिकेशनचे वर्ग घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, माधवनने मुंबईत अर्धवेळ नोकरी म्हणून मॉडेलिंगला सुरुवात केली. 1996 मध्ये, माधवनने आपला एक पोर्टफोलिओ मॉडेलिंग एजन्सीकडे पाठवला जिथून त्याला जाहिरातींच्या ऑफर मिळू लागल्या. 

1997 मध्ये माधवनने चंदनच्या टीव्ही जाहिरातीतून करिअरची सुरुवात केली. यावेळी माधवनने मणिरत्नमच्या चित्रपटासाठी स्क्रीन टेस्टही दिली, पण तो त्या भूमिकेसाठी योग्य नसल्याचे सांगत त्याला वगळण्यात आले. 

माधवनचा पहिला चित्रपट

आर माधवनने हार मानली नाही आणि छोट्या पडद्यावर छाप पाडण्यास सुरुवात केली. या अभिनेत्याने अनेक टेलि शोमध्ये काम केले. माधवन त्याच्या चमकदार कामामुळे ओळखला गेला आणि 1998 मध्ये माधवनने 'इन्फर्नो' या इंग्रजी चित्रपटात भारतीय पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली. 

मात्र या चित्रपटातून माधवनला फारशी प्रसिद्धी मिळवता आली नाही. यानंतर करिअरमध्ये पुढे जाताना या अभिनेत्याने अनेक साऊथ चित्रपटांमध्येही काम केले. आर माधवनला साऊथचा फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे. 

रेहना है तेरे दिल मे

आर माधवनला खरी ओळख 'रेहना है तेरे दिल में' या हिंदी चित्रपटातून मिळाली. हा एक रोमँटिक चित्रपट होता, ज्यामध्ये दिया मिर्झा माधवनसोबत दिसली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली. इकडे चित्रपट हिट झाला आणि तिकडे त्याच्यासाठी चित्रपटांची रांग लागली. त्यानंतर आर माधवन 'गुरू'मध्ये दिसला.

HBD R.Madhvan
Asur 2 Twitter Review : ट्विस्ट आणि सस्पेन्सचा थरार...असुर 2 पाहिलात का?

माधवनचं दिग्दर्शन

 'गुरु'मध्ये आर माधवनशिवाय ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात आर माधवनच्या अभिनयाचे चाहते आणि समीक्षक दोघांनीही खूप कौतुक केले होते. 2010 मध्ये, आर माधवन राजू हिरानी दिग्दर्शित '3 इडियट्स' चित्रपटात दिसला, जो सुपर डुपर हिट ठरला होता. 

नुकताच माधवन 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट'मध्ये दिसला होता या चित्रपटाचं दिग्दर्शनही त्यानेच केलं होतं. या चित्रपटातून अभिनय आणि दिग्दर्शन या दुहेरी भूमीकेत माधवन चांगलाच यशस्वी झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com