आर. माधवनने कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये केले पंतप्रधान मोदींचे कौतुक

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी शेअर केला व्हिडीओ
R MADHVN
R MADHVNDainik Gomantak

कान्स चित्रपट महोत्सवात यंदा भारत सहभागी झाला आहे. सध्या सर्वत्र या 75 व्या कान्स फिल्म फेस्टिवलची धामधूम सुरु आहे. तो 28 मे पर्यंत असणार आहे. या महोत्सवात सहभागी झालेल्या अभिनेता आर माधवन याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे. याबद्दलचा व्हिडीओ केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. (R. Madhavan praises PM Modi at Cannes Film Festival )

R MADHVN
Jr NTR Birthday: रामा राव ज्युनियर करोडोंच्या संपत्तीचा मालक

या वेळी आर माधवन म्हणाला की, “आपल्या देशात डिजीटलायझेशन होणे हे एक मोठे संकट असेल अशी शंका जगाला वाटत होती. आपल्या देशात शेतकऱ्यांना स्मार्टफोन कसा वापरायचा, व्यवहार कसे करायचे याची काहीही माहिती नव्हती. पण गेल्या काही वर्षात हे दृष्य पूर्णपणे बदलले आहे. भारत हा सूक्ष्म अर्थव्यवस्थेचा सर्वात मोठा वापरकर्ता बनला आहे.”

“माधवनचा हा व्हिडीओ केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात आर माधवनने हा रोख रक्कम या पैशाचा कमी वापर करत डिजीटल अर्थव्यवस्थेच्या दिशेने सुरु असलेल्या स्थितीबद्दलही भाष्य केले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले त्या वेळची देशाची स्थिती आणि सद्या देशातील स्थिती यानंतर शेतकरी कसे तंत्रज्ञान वापरु लागले आहेत. याबाबत भाष्य केले आहे.

R MADHVN
Video: जान्हवी कपूर पुन्हा एकदा तिच्या ड्रेसमुळे झाली ट्रोल

कान्स महोत्सवामध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले. त्यासोबतच आर माधवन, नवाजुद्दीन सिद्दीकी, ग्रॅमी पुरस्कार विजेते रिकी केज, शेखर कपूर, प्रसून जोशी आणि इतर व्यक्तीही कान्स महोत्सवात उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com