भारताची लोकसंख्या चुकीची सांगितल्यानं आर. माधवन ट्रोल

R Madhavan Trolled: बॉलिवुड अभिनेता आर. माधवन सध्या सोशल मिडीयावर त्याच्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आला आहे.
R Madhavan
R MadhavanDainik Gomantak

बॉलिवुडमधील प्रसिध्द अभिनेता आर माधवन (R Madhavan) त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकतो. लवकरच त्याचा 'रॉकेट्री: द नांबी इफेक्ट' (Rocketry: The Nambi Effect) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. आर. माधवन सध्या त्याच्या एका वक्तव्यामुळे सोशल मिडीयावर चर्चेत आला आहे. त्याने एका मुलाखतीमध्ये भारताची लोकसंख्या 25 लाख आहे असे सांगितले आहे. त्यामुळे सध्या आर माधवनला अनेक लोक ट्रोल करत आहेत. (R Madhavan Trolled News)

एका युझरने आर. माधवनचा व्हिडीओला (Video) एक व्हिडीओ शेअर करुन लिहिले, 'त्याच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी नॉन स्टॉप काहीही बोलत आहेत. चित्रपटाचं प्रमोशन करण्याचा दुसरा मार्ग तुम्हाला दिसला नाही का?' आर माधवननं या ट्रोलरला त्याच्या हटके अंदाजानं उत्तर दिलं. तो म्हणाला, 'ईझी ब्रो.. तुम्ही एक खेळाडू आहात. माझी झोप पूर्ण झाली नाही, त्यामुळे मी 250 लाखाच्या ऐवजी 25 लाख म्हणालो. पण तरीही लोकसंख्या मी 1.7 टक्के कमी सांगितली. भावा तुझ्या मनात एवढा द्वेष का आहे? द्वेष हा तुझ्या खेळासाठी चांगलं नाहीये.'

R Madhavan
‘धर्मवीर’ मधील खास फोटो शेअर करत प्रसाद ओकने दिल्या महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा

आर. माधवन याचा ‘रॉकेट्रीः द नंबी इफेक्ट’ हा चित्रपट (Movie) 1 जुलै रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि इंग्रजी या भाषांमध्ये रिलीज होणार आहे. कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये रॉकेट्री चित्रपटाचा प्रीमियरही झाला. त्यामुळे या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. या चित्रपटाचे कथानक भारतीय शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्या जीवनावर आधारित आहे. आर माधवन या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार असून त्याने या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com