विनोदी शैलीत आर. माधवनने दिली कोरोना बाधित झाल्याची माहिती

दैनिक गोमंतक
गुरुवार, 25 मार्च 2021

बॉलिवूडमधील बॉलिवूड मधील प्रसिद्ध कलाकार अमीर खानचा कोरोना अहवाल सकारात्मक आला होता. त्यातच आता आर. माधवन देखील कोरोना बाधित झाल्याचे समोर आले आहे.

वर्षभरापूर्वी जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूने(Corona Virus) पुन्हा डोके वर काढल्याचे दिसून येते आहे. राज्यात आणि देशात ही परिस्थिती बिकट होत चालली असून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यातच आता कोरोना विषाणूने सिनेसृष्टीत शिरकाव केल्याचे दिसते आहे. काही दिवसांपूर्वी बॉलिवूड मधील प्रसिद्ध कलाकार अमीर खानचा देखील कोरोना अहवाल सकारात्मक आला होता. त्यातच आता आर. माधवन देखील कोरोना बाधित झाल्याचे समोर आले आहे. अतिशय विनोदी शैलीत ही माहिती  आर. माधवनने  आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही माहिती दिली.(R.madhvan tested covid poitive) 

प्रसिद्ध चित्रपट थ्री इडियट्स(Three Idiots) या चित्रपटातील प्रमुख कलाकार अमीर खान, आर. माधवन आणि शर्मन जोशी हे प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेले उत्तम कलाकार आहेत. कोरोना विषाणूने सर्व जगातच हैदोस घातला असताना बॉलिवूडमधील कलाकार सुद्धा कोरोना बाधित होताना दिसत आहेत. प्रसिद्ध कलाकार अमिर खान(Amir Khan) हा काही दिवसांपूर्वी कोरोना बाधित झाला होता. त्यातच आता थ्रीइडियट्स  मधील त्याचा सहकलाकार आर. माधवन(R.Madhavan) देखील सकारात्मक आला. थ्री इडियट्स मध्य अमीर खान सोबत काम केले होते. यावेळी कोरोना बाधित झाल्याची माहिती देताना आर. माधवनने थ्री इडियट्स चित्रपटातील आठवणी जाग्या केल्या. 'फरहानला नेहमी रँचोचे अनुकरण करत असतो आणि व्हायरस नेहमी आपल्या मागे असतो, मात्र यावेळी व्हायरसने आपल्याला पकडले आहेत', असे म्हणत आर. माधवनने आपण कोरोना बाधित झाल्याची माहिती दिली. 

या ट्विटसोबत फरहानने थ्री इडियट्स चित्रपटातील एक  मजेदार फोटो सुद्धा शेअर केला आहे. या ट्विटवर चाहत्यांनी सुंदर प्रतिकिया देत, दोघानांही काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.तसेच थ्री इसिएट्स मधील आपल्या तिसऱ्या सहकलाकाराबद्दल बोलताना आर. माधवन म्हणाला की, ही एकमेव अशी जागा आहे 
जिथे राजू येऊ नये असे आम्हाला वाटत. 

गंगूबाई काठियावाडी चित्रपटासाठी संजय लीला भन्साळी आणि आलिया भटला न्यायालयाचे...

संबंधित बातम्या