
दरवर्षीप्रमाणे येदाही आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) गोव्यात (Goa) होणार आहे. या महोत्सवात अनेक चित्रपटांची झलक पाहायला मिलणार आहे. तसेच मराठमोळा अभिनेता संदीप पाठकचा (Sandeep Pathak) 'राख' (Raakh) हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर चर्चेत आहे. 53 व्या इफ्फीमध्ये 'राख' चित्रपटाची निवड झाल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यांनी जाहीर केले आहे.
इफ्फीत (IFFI) दरवर्षी सिनेसृष्टीतील दर्जेदार चित्रपटांची निवड होत असते. तसेच अनेक सर्वोत्कृष्ट चित्रपट या महोत्सवात रिलीज होत असतात. 'राख' चित्रपटाला रिलीजपूर्वीच अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त झाले आहेत. 'राख' हा एक मूकपट आहे. त्यामुळे या प्रयोगाचे सध्या सिनेसृष्टीत कौतुक होत आहे. या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा राजेश चव्हाणने सांभाळली आहे.
राख या चित्रपटामध्ये संदीप पाठक आणि अश्विनी गिरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. संदीप आणि अश्विनी दोघांनाही या चित्रपटासाठी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सावत पुरस्कार प्राप्त झाले आहेत. हा चित्रपट कोरोनाच्या (Corona) पार्श्वभूमीवर आधारित आहे.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (International Film Festival of India) हा आशियातील सर्वात जुना तसेच भारतातील सर्वात मोठा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आहे. येत्या 20 नोव्हेंबर पासून गोव्यात (Goa) हा महोत्सव पार पडणार आहे. 20 ते 28 नोव्हेंबरदरम्यान हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवात 79 देशातील 280 चित्रपट दाखवले जाणार आहेत.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.